शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये बदल होऊ शकतो, मेयोत का नाही ?

By admin | Updated: February 23, 2015 02:44 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कामकाजात गेल्या तीन महिन्यांमध्ये सुसूत्रता आली. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या वाढली.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कामकाजात गेल्या तीन महिन्यांमध्ये सुसूत्रता आली. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या वाढली. विशेषत: स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. मेडिकलमध्ये हा बदल होऊ शकतो, तर मेयोमध्ये का नाही, असा सवाल महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांना विचारून कोंडीत पकडले. आज रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मुख्य सचिव क्षत्रिय यांनी नागपुरातील निवासस्थानी शासकीय रुग्णालयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला सचिव मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला क्षत्रिय यांनी मेडिकलच्या विविध विषयांवर चर्चा केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी मेडिकलची पाहणी करून डॉ. निसवाडे यांच्या कामाची प्रशंसा केली होती. आजच्या बैठकीतही क्षत्रिय यांनी अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले. मात्र, मेयो रुग्णालयातील अस्वच्छता, सुरक्षा, औषधांचा तुडवडा यावर, क्षत्रिय यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयाच्या दृष्टीने विकासात्मक पावले उचलण्याची कडक सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय या बैठकीत क्षत्रिय यांनी स्वाईन फ्लू, वाहतुकीची कोंडी, मेडिकलच्या जमिनीचा प्रश्न, न्यायालयातील याचिका आदी बाबींचाही आढावा घेतला. (प्रतिनिधी)