शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मेयोत चौकशी समिती स्थापन

By admin | Updated: July 7, 2015 02:25 IST

उपराजधानीत ‘गर्भाशयाचा सौदा’ होत असल्याच्या खुलाशानंतर सोमवारी पोलीस व प्रशासन चांगलेच हादरले

नागपूर : उपराजधानीत ‘गर्भाशयाचा सौदा’ होत असल्याच्या खुलाशानंतर सोमवारी पोलीस व प्रशासन चांगलेच हादरले. मेयो रुग्णालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तडकाफडकी एक समिती स्थापन केली. तसेच पीडित महिलेच्या सुरक्षेसाठी दोन महिला व सुरक्षा कर्मचारी तैनात केले. आर्थिक टंचाईमुळे एका महिलेने २५ हजार रु पयांत बाळाचा सौदा केल्याची माहिती पुढे आली होती. यासाठी पारडी येथील सोनू नावाच्या युवकाने त्या महिलेला तयार केले होते. त्याने पीडित महिलेची लक्ष्मी व किरण नावाच्या महिलांशी भेट करू न दिली होती. त्या दोघींनी आपल्या कथित बहिणीसाठी बाळाची खरेदी करायची असल्याचे सांगितले होते. यानंतर पीडित महिला सुमारे तीन महिने त्यांच्याजवळ राहिली. शिवाय गत सहा दिवसांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र तिने मुलाला जन्म देताच लक्ष्मी, किरण व सोनू यांच्यात भांडण सुरू झाले. तिघेही त्या बाळाला घेऊन जाण्यासाठी आपसात भांडू लागले. परंतु पीडित महिला बाळाला देण्यास तयार नव्हती. दरम्यान, ‘लोकमत’ने या टोळीचा भंडाफोड करताच पोलीस व मेयो प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर मेयो रुग्णालयाने पीडित महिलेची सुरक्षा वाढवून तिला पेर्इंग वॉर्डमध्ये ठेवले. यावेळी त्याच वॉर्डात इतर चार महिला रुग्णांनाही ठेवण्यात आले होते. परंतु सोमवारी त्या चार महिलांना तेथून हलविण्यात आले. यानंतर चौकशी समिती व तहसील पोलिसांनी त्या पीडित महिलेची चौकशी केली. दरम्यान, महिलेने संपूर्ण हकीकत सांगितली. तेव्हापासून पोलीस सोनू, लक्ष्मी व किरण यांचा शोध घेत आहेत. पीडित महिलेजवळ मोबाईल फोन नाही. त्यामुळे तिच्याकडे कुणाचा नंबरसुद्धा नाही. मात्र तिने संबंधित परिसरात गेल्यानंतर तिला ठेवण्यात आलेल्या घराची ओळख सांगता येईल, असे सांगितले. दुसरीकडे मेयो रुग्णालय परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पीडित महिलेच्या कक्षात डॉक्टरांशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांना येथे येणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकरणात रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचीही पोलखोल झाली आहे. येथील पेर्इंग वॉर्डाशेजारीच सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय आहे. शनिवारी येथे बाळाच्या खरेदीवरू न सोनू, लक्ष्मी व किरण यांच्यात भांडण झाले. परंतु त्याची कुणालाही भनकसुद्धा लागली नाही. मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.(प्रतिनिधी)चेहऱ्यावर हास्य ‘लोकमत’ने या प्रकरणाचा खुलासा करताच पीडित महिलेच्या चेहऱ्यावरील हास्य परत आले आहे. ती आता आपल्या बाळाला सोबत घेऊन जाऊ शकते, असा तिला विश्वास आला आहे. आर्थिक टंचाईमुळे सोनूच्या जाळ्यात अडकल्याचे तिने मान्य केले. डॉक्टरांचा सल्ला गर्भाशयाच्या सौद्याची खरी कहाणी पुढे येताच मेयो रुग्णालयातील डॉक्टरांनी महिला रुग्णांना शांत राहण्याचा सल्ला दिला. या प्रकरणामुळे प्रशासन हादरले आहे. प्रशासनाला प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यावे लागत आहे.