शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतही मराठ्यांची वज्रमुठ

By admin | Updated: October 24, 2016 02:44 IST

सकल मराठा समाजातर्फे २५ आॅक्टोबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला शहरातील तब्बल १६ वेगवेगळ््या सामाजिक संघटनांनी

मोर्चाला १६ संघटनांचा पाठिंबा : पोलीस प्रशासनही सज्जनागपूर : सकल मराठा समाजातर्फे २५ आॅक्टोबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला शहरातील तब्बल १६ वेगवेगळ््या सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता रेशीमबाग मैदानावरून निघणाऱ्या या मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी महाल येथील राजे तेजसिंगराव भोसले सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. मागील तीन महिने राज्यभरात लाखोंच्या संख्येत निघालेल्या मोर्चानंतर आता नागपुरातील या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोर्चातसुद्धा लाखो मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डी येथील घटनेचा निषेध नोंदवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवावा, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासारख्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. विशेष म्हणजे, हा जिल्हास्तरीय मोर्चा असून, पुढील १४ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन काळात विधानभवनावर काढण्यात येणारा मोर्चा राज्यस्तरीय राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. २५ आॅक्टोबरच्या मोर्चात पुरुषांसह महिला व तरुण-तरुणींची फार मोठी संख्या राहणार आहे. या मोर्चासाठी संपूर्ण विदर्भातील मराठा बांधव एकजूट होणार आहेत. सकल मराठा समाजाने या मोर्चासाठी एक आचारसंहिता तयार केली असून, त्यानुसार संपूर्ण नियोजन केले जात आहे. राज्यभरातील मोर्चाप्रमाणे या मोर्चाचे नेतृत्वसुद्धा पाच मुली करणार आहेत. असा आहे मोर्चाचा मार्ग २५ आॅक्टोबर रोजी मराठा क्रांती मूकमोर्चासाठी संपूर्ण विदर्भातून येणारे मराठा समाज बांधव रेशीमबाग मैदानावर एकत्रित होणार आहेत. यानंतर सकाळी ११ वाजता मोर्चा मार्गक्रमण करून तो तुळशीबाग, महाल, गांधीगेट, सुभाष रोड, टेकडी रोड व संविधान चौकमार्गे दुपारी २ वाजताच्या सुमारास कस्तुरचंद पार्कवर पोहोचेल. येथे सर्वप्रथम कोपर्डी घटनेत बळी पडलेल्या निरपराध बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्यानंतर जिजाऊ वंदन करून मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या पाच मुली मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणाऱ्या निवेदनाचे जाहीर वाचन करतील. तसेच यानंतर त्या मुली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. निवेदन सोपवून त्या मुली परत मोर्चेस्थळी येतील. निवेदन दिल्याची घोषणा केली जाईल आणि शेवटी राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल.