शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा एकवटणार

By admin | Updated: October 25, 2016 02:48 IST

आतापर्यंत महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या संख्येत निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चानंतर आता

नागपूर : आतापर्यंत महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये लाखोंच्या संख्येत निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चानंतर आता सकल मराठा समाज उपराजधानीत आपली ताकद दाखविणार आहे. मंगळवारी लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरणार आहेत. कोपर्डी येथील घटनेनंतर ९ आॅगस्ट रोजी औरंगाबाद येथे पहिला मराठा क्रांती मूकमोर्चा निघाला होता. यानंतर महाराष्ट्रातील तब्बल २४ जिल्ह्यात लाखोंच्या संख्येत मोर्चे निघाले. या सर्व मोर्चातून तब्बल तीन कोटी समाज बांधव रस्त्यांवर उतरले आहेत. या सर्व मोर्चांचे आजपर्यंत कुणीही नेतृत्व केलेले नाही. तीच आचारसंहिता नागपुरातील मोर्चादरम्यानसुद्धा पाळली जाणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून येणारे मराठा बांधव रेशीमबाग मैदानावर एकत्रित होणार आहेत. यानंतर सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. शिवाय यानंतर मोर्चा तुळशीबाग मार्गे, महाल, गांधीगेट, सुभाष रोड, टेकडी रोड व संविधान चौक असे मार्गक्रमण करीत दुपारी २ वाजताच्या सुमारास कस्तूरचंद पार्क येथे पोहोचेल. या मोर्चात अडीच ते तीन लाख मराठा बांधव सहभागी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सकल मराठा समाजाच्या नियोजन समितीने या मोर्चाची जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे या मोर्चात पुरुषांसह महिला आणि तरुण-तरुणींचा प्रचंड सहभाग राहणार आहे. तरुण-तरुणींमध्ये या मोर्चाविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. (प्रतिनिधी) १५ रुग्णवाहिकांसह २०० डॉक्टरांची चमू मराठा क्रांती मूकमोर्चात १५ रुग्णवाहिकांसह २०० डॉक्टरांच्या चमूचा सहभाग राहणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, शासकीय दंत महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, केडीके डेंटल कॉलेज व लता मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा समावेश राहणार आहे. या आहेत मागण्या १) कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या. २) मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे. ३) अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबावा. ४) अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा. ५) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, ६) शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा.