शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज खारीज

By admin | Updated: December 24, 2015 03:38 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी बुधवारी माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाचा

हायकोर्ट : दोन दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देशनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी बुधवारी माओवादी डॉ. गोकराकोंडा नागा साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळून त्याला दोन दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिलेत.साईबाबा हा दिल्ली विद्यापीठाच्या रामलाल आनंद महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे. अहेरी पोलिसांनी त्याला राज्य शासनाने बंदी घातलेल्या सीपीआय-मोवोवादी संघटनेचा सदस्य असल्याच्या कारणावरून ९ मे २०१४ रोजी अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणाची स्वत:हून दखल घेतल्यानंतर साईबाबाला ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला होता. यामुळे त्याला सोडण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबाला जामीन कायम करण्यासाठी नागपूर खंडपीठात अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानुसार साईबाबाने गेल्या आॅक्टोबरमध्ये नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज बुधवारी फेटाळण्यात आला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्राला अटक झाल्यानंतर साईबाबाला अटक करण्यात आली होती. मिश्रा हा साईबाबा व छत्तीसगडमधील मावोवादी यांच्यात माहितीची आदान-प्रदान करीत होता असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. साईबाबातर्फे वरिष्ठ वकील रेबेका जॉन (सर्वोच्च न्यायालय), अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग व अ‍ॅड. हर्षल लिंगायत तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व सहायक सरकारी वकील अनिल लद्धड यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)राष्ट्राविरोधात वापरतोय ज्ञानइतर आरोपींना सोडल्यामुळे साईबाबालाही सोडण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. न्यायालयाने हा मुद्दा खोडून काढला आहे. इतर आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे आढळून आले नव्हते. यामुळे त्यांना जामीन देण्यात आला. अशी परिस्थिती साईबाबाच्या बाबतीत नाही. साईबाबा बुद्धिजीवी असून तो आपल्या ज्ञानाचा वापर राष्ट्रविरोधी कारवायांसाठी करीत आहे. यामुळे इतरांप्रमाणे साईबाबाला जामीन दिला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने २५ आॅगस्ट २०१४ रोजी साईबाबाचा जामीन अर्ज गुणवत्तेवर फेटाळला होता. साईबाबाच्या वकिलाने या आदेशावर घेतलेले आक्षेप न्यायालयाने खारीज केले आहेत.