शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळात अनेकांची अडकली पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 20:50 IST

अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त सेवकाला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेन्शनचा आधार असतो. मात्र, काही निवृत्त सेवकांना ही पेन्शन मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. ईपीएफ ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत हा घोळ होत असल्याचे पुढे येत आहे.

ठळक मुद्देपीएफ ऑफिसमध्ये संसर्गाचा शिरकाव झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त सेवकाला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी पेन्शनचा आधार असतो. मात्र, काही निवृत्त सेवकांना ही पेन्शन मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. ईपीएफ ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत हा घोळ होत असल्याचे पुढे येत आहे.बऱ्याच शासकीय, निमशासकीय आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला त्याच्या निवृत्तीनंतर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमधून निवृत्तिवेतन मिळत असते. सेवेत असताना त्याच्या पगारातून होणाऱ्या कपातीतून संबंधिताच्या उत्तर काळासाठी ही योजना आहे. त्यासाठी प्रत्येक निवृत्तिवेतन (पेन्शन)धारकाला त्यासाठी हयात असल्याचे ‘जीवन प्रमाण’ प्रमाणपत्र भरून द्यावे लागते. नोव्हेंबर ते नोव्हेंबर असा या प्रमाणपत्राचा काळ असतो. पूर्वी जानेवारीपर्यंत हे प्रमाणपत्र भरून देण्याची मुभा होती. मात्र, त्यात सुधारणा करत आता हे प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये भरणे व अपडेट करावे लागत आहे. मात्र, वृद्धत्वामुळे अनेक जण प्रमाणपत्र अपडेट करणे विसरतात. त्याबाबत कार्यालयाकडून तशी सूचनाही वारंवार दिली जाते. ही सर्व यंत्रणा ऑटोमॅटिक आहे. परंतु, मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाने ही सर्व यंत्रणा विस्कळीत पडल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम अनेकांचे प्रमाणपत्र अपडेट झालेले नाहीत. शिवाय, ईपीएफओमध्येही कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आणि कोरोनामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांचा बळीही गेला आहे. याचा फटका निवृत्तिवेतनधारकांना बसतो आहे.चार-पाच महिन्यापासून पेन्शनच नाही - चतारेमी ऑल इंडिया रिपोर्टरमध्ये नोकरीला होतो. २०१७ मध्ये सेवेतून निवृत्त झालो. निवृत्तिवेतन बरोबर खात्यात जमा होत होते. मात्र, गेल्या चार-पाच महिन्यापासून पेन्शन बंद झाली आहे. माझे जीवन प्रमाणपत्र अपडेट असतानाही ही समस्या होत आहे. मी स्वत: आजारामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होतो. अशा अडचणीच्या काळातही पेन्शन मिळत नसेल तर काय अर्थ आहे, अशी भावना ओमप्रकाश चतारे यांनी व्यक्त केली.कर्मचाऱ्यांची उणीवकोरोनामुळे ईपीएफओमध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांचे निधन झाले आणि काही कर्मचारी क्वारंटाईन आहेत. अशा स्थितीत या समस्या निर्माण होत आहेत. अनेकांनी ऑटोमॅटिक यंत्रणेद्वारेही आपले जीवन प्रमाणपत्र अपडेट केले नाही. मात्र, हे प्रमाणपत्र अपडेट झाले की पेन्शन सुरू होईल, अशी माहिती ईपीएफओमधील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीnagpurनागपूर