शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी बाजार हत्याकांड : केवळ पाच हजारासाठी खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:38 IST

केवळ पाच हजार रुपयासाठी सदर येथील मंगळवारी बाजारात गुन्हेगारांनी भाजी विक्रेत्याच्या कर्मचाऱ्याचा खून केला.

ठळक मुद्देसूत्रधार गुन्हेगारासह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ पाच हजार रुपयासाठी सदर येथील मंगळवारी बाजारात गुन्हेगारांनी भाजी विक्रेत्याच्या कर्मचाऱ्याचा खून केला. सदर पोलिसांनी आरोपी खुशाल प्रभाकर राजुरकर (२६) आणि अक्षय कमलेश फुसाटे (२५) रा. रामबाग याला अटक केली. खुशालचा भाऊ सूर्यकांत राजुरकर, साथीदार अक्षय रामटेके आणि एक अल्पवयीन फरार आहे.सुभाष मोहल्ले (२६) हा भाजी दलाल किशोर कांबळे यांच्याकडे काम करीत होता. पैशाच्या वसुलीसाठी त्याचे मंगळवारी बाजारात येणे-जाणे होते. खुनाचा सूत्रधार खुशाल राजुरकर याच्यासोबत त्याची ओळख होती. खुशाल आणि खुनात सहभागी त्याच्या भावासह सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. सुभाषने खुशालला २० हजार रुपये उधार दिले होते. त्याच्या बदल्यात खुशालची बाईक गहाण ठेवली होती. खुशालने दीड महिन्यापूर्वी पैसे परत करून बाईक सोडवून घेतली. यानंतरही सुभाष त्याला पाच हजार रुपये मागत होता. यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. खुशाल आणि त्याचे साथीदार गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, याची सुभाषला जाणीव होती. यानंतरही तो त्यांच्याशी वाद घालायचा. मंगळवारी दुपारी पैस मागण्यावरून पुन्हा त्यांचा वाद झाला. खुशालचे म्हणणे आहे की, सुभाषने त्याला शिवीगाळ करीत मंगळवारी बाजारात येण्याचे आव्हान दिले होते. यामुळे त्याला प्रचंड राग आला. तो आपला भाऊ आणि साथीदारासह मंगळवारी बाजारात गेला आणि सुभाषवर हल्ला केला. त्याचा खून करून फरार झाला. पोलिसांनी मंगळवारी रात्रीच खुशाल आणि त्याचा साथीदार अक्षयला अटक केली.खुशालचे म्हणणे आहे की, त्याने सुभाषकडून घेतलेले २० हजार रुपये परत केले होते. यानंतरही सुभाष त्याला पाच हजार रुपये मागत होता. त्यासाठी त्याला वारंवार अपमानित करायचा. त्याला शिवीगाळ करून धमकवायचा. त्यामुळे त्याचा खून केला.सुभाष गरीब कुटुंबातील होता. त्याच्या कुटुंबात पत्नी, आई आणि दोन वर्षाची मुलगी आहे. त्याच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. यामुळे तो लहानपणापासूनच किशोर कांबळे यांच्याकडे काम करीत होता. कांबळेने त्याला मुलासारखे ठेवले होते. सुभाषच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. वयोवृद्ध आई, विधवा पत्नी आणि मुलीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर पोलिसांनी खुशाल व अक्षयला न्यायालयासमोर सादर करून १ ऑगस्टपर्यंत ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून