महिला डॉक्टरसमोर मोबाइल ठेवत पाहिले घाणेरडे व्हिडीओ! विमानात अश्लील इशारे करून छेडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:46 IST2023-10-11T10:44:48+5:302023-10-11T10:46:11+5:30

महिला डॉक्टरने दिला चोप; पुण्यातील आरोपी ताब्यात

man watched dirty videos in front of the female doctor! Teased with obscenities on the plane | महिला डॉक्टरसमोर मोबाइल ठेवत पाहिले घाणेरडे व्हिडीओ! विमानात अश्लील इशारे करून छेडले

महिला डॉक्टरसमोर मोबाइल ठेवत पाहिले घाणेरडे व्हिडीओ! विमानात अश्लील इशारे करून छेडले

नागपूर : विमानात प्रवास करणे हे तुलनेने सुरक्षित मानण्यात येते, मात्र मागील काही दिवसांपासून विमान प्रवासातदेखील गुन्हे घडल्याची बाब समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरदेखील असाच प्रकार समोर आला आहे.

विमानातील एका प्रवाशाने लँडिंगदरम्यान सहप्रवासी असलेल्या महिला डॉक्टरचा विनयभंग केला. महिलेनेदेखील हिंमत दाखवत त्याची कॉलर धरून त्याला चोप दिला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. फिरोज शेख नूर मोहम्मद शेख (३२, दुर्रानी कॉम्प्लेक्स, मिठानगर, कोंडवा) असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास पुणे ते नागपूर विमानात फिरोज प्रवास करत होता. तो अभियंता आहे. त्याच्या बाजूला ४० वर्षीय महिला डॉक्टर बसली होती. सोमवारी ती पुण्याहून निघाली. प्रवासादरम्यान फिरोज तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. मात्र, डॉक्टरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मोबाइल समोर ठेवून घाणेरडे व्हिडीओ पाहणे सुरू केले.

नागपूर विमानतळावर लँडिंग करत असताना फिरोजने महिलेकडे पाहून अगोदर अश्लील इशारा केला व त्यानंतर तिच्यासोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केला. महिलेने अगोदर विमानातील कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली व त्यानंतर तिने विमानतळावर उतरल्यावर सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी फिरोजविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Web Title: man watched dirty videos in front of the female doctor! Teased with obscenities on the plane