शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना स्थायी करा

By admin | Updated: April 6, 2016 03:08 IST

खुल्या भरतीद्वारे २००९ मध्ये नोकरीवर रुजू झालेल्या १०९ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची मागणी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या

साखळी उपोषणाचा इशारा : केवळ ३५०० रुपये पगारनागपूर : खुल्या भरतीद्वारे २००९ मध्ये नोकरीवर रुजू झालेल्या १०९ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची मागणी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये कार्यरत असलेल्या १०९ कर्मचाऱ्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांच्याकडे केली. नियमित वेतनश्रेणीवर १५ दिवसांत कायम न केल्यास कामबंद धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना केली. मंगळवारी सकाळी ११ वाजता १०९ कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन कदम यांना दिले. सर्व कर्मचारी जुलै २००९ पासून बँकेच्या विविध शाखांमध्ये केवळ ३५०० रुपये मासिक पगारावर कार्यरत आहेत. तेव्हाचे प्रशासक दुष्यंत सिडाम यांनी भरतीद्वारे पदवीधर कर्मचाऱ्यांना बँकेच्या सेवेत सामावून घेतले होते. त्यांचा दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी होता. तो जुलै २०११ मध्ये संपला. त्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याची आणि बँकेला परवाना नसल्याची बाब पुढे करून अतिरिक्त चार वर्ष सहा महिन्यांनी वाढविलेला जादाचा कालावधी असा एकूण सहा वर्ष आठ महिन्यांचा होऊनसुद्धा अद्यापही बँकेच्या सेवेत कायम करण्यात आलेले नाही. पुन्हा हाच एकत्रित पगारमानाचा कालावधी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. बँकेला आर्थिक परवाना मिळाला आहे आणि स्थितीही उत्तम असताना आमचा कालावधी का वाढविण्यात आला, हे एक गूढ असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तुटपुंज्या पगारात सेवा अशक्यएवढ्याशा तुटपुंजा पगारात कुटुंबाला उपाशी ठेवून सेवा देणे अवघड आणि अशक्य आहे. त्यामुळेच आम्हाला बँकेच्या मुख्यालयी कामबंद धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आम्ही पूर्वी संचालक मंडळ आणि प्रशासकीय मंडळाला नोकरीत कायम करण्यासाठी वारंवार निवेदन दिली. पण त्यांनीही निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. १०९ कर्मचाऱ्यांना वगळता बँकेतील सर्व नियमित कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार आणि सुविधा मिळतात, मग आम्हाला काय नाही, असा सवालही कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. (प्रतिनिधी)सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर बँक मेहरबानआम्हाला कायम करण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेत सामावून घेण्याचे धोरण प्रशासकीय मंडळाचे दिसून येते. आतापर्यंत १० पेक्षा जास्त सेवानिवृत्तांना गरज नसतानाही पुन्हा नोकरीत सामावून घेतले आहे. त्यांना आमचा विरोध आहे. गरजू तरुणांना नोकरी देण्याची आमची मागणी आहे.