शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रो अधिक क्षमतेने काम करेल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:17 IST

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कार्यपद्धती आणि पहिल्या टप्प्याच्या कामाचे फलित म्हणूनच दुसऱ्या टप्प्याच्या कामाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी ...

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कार्यपद्धती आणि पहिल्या टप्प्याच्या कामाचे फलित म्हणूनच दुसऱ्या टप्प्याच्या कामाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संस्थेने अभूतपूर्व आणि असामान्य कार्य हा या यशाचा परिणाम आहे. आता अधिक क्षमतेने काम करण्याचा संकल्प स्थापनादिनी करण्यात येत असल्याचे प्रतिपादन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी केले.

महामेट्रोचा सहावा वर्धापनदिन गुरुवारी दीक्षाभूमीसमोरील महामेट्रोच्या गुंज सभागृहात गुरुवारी साजरा करण्यात आला. व्यासपीठावर प्रकल्प संचालक महेशकुमार, वित्त संचालक एस. शिवमाथन आणि रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर उपस्थित होते.

दीक्षित म्हणाले, सहा वर्षात आम्ही अनेक मैलाचे दगड पार केले आणि यशाचे मानकरी ठरलो. आम्हाला मिळालेले काम हा एकप्रकारे आमचा केलेला गौरवच आहे. यामध्ये नवी मुंबईचे उर्वरित काम पूर्ण करण्याच्या जबाबदारी व्यतिरिक्त नाशिक मेट्रोच्या कामाचाही समावेश आहे. ज्या चिकाटीने, संयमाने आणि कर्तव्यतत्पर राहून काम केले आहे त्यापेक्षा अधिक क्षमतेने काम करण्याची गरज आहे. आता तर मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या कार्याबद्दलही चर्चा होऊ लागली आहे. नववर्षाच्या पहिल्या तिमाहीत दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात सचिन ढोमणे, आनंद निर्वाण, जुगल किशोर बोरकर, निखिल वानखेडे आणि सुधीर डबीर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महामेट्राचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे यांनी आभार मानले.