शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

महाविकास आघाडीचा नागपूरवर अन्याय : ५२५ कोटीची डीपीसी २९९ कोटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:39 PM

गेल्या वर्षी ५२५ कोटी रुपयांची डीपीसी यंदा २९९.५२ कोटीवर आणून महाविकास आघाडीच्या सरकारने एकप्रकारे नागपूरवर अन्याय केला आहे.

ठळक मुद्देविकास कामांवर होणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील पाच वर्षांत नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) वाढीव निधी मिळत आला आहे. ही वाढ सातत्याने होत गेली. गेल्या वर्षी नागपूरची डीपीसी ही ५२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. नागपूरसारख्याउपराजधानीच्या शहराच्या विकासाला त्यामुळे मोठा हातभार लागला. राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येसुद्धा नागपूर जिल्ह्याला तीन महत्त्वाचे खाते मिळाले. गृहमंत्री व ऊर्जामंत्री नागपूर जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे नागपूरच्या विकासाचे चक्र हे कायम राहील. डीपीसीच्या निधीत यंदाही वाढ होईल, असे वाटत होते. पालकमंत्र्यांनी तसा दावाही केला होता. परंतु लोकांच्या अपेक्षा आणि पालकमंत्र्यांचा दावाही फोल ठरला. गेल्या वर्षी ५२५ कोटी रुपयांची डीपीसी यंदा २९९.५२ कोटीवर आणून महाविकास आघाडीच्या सरकारने एकप्रकारे नागपूरवर अन्याय केला आहे.नागपूर जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात २९९ कोटी ५२ लाख रुपयांच्या नियोजन आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंजुरी दिली. शासनाने २४१ कोटी ८६ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करून दिली होती. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी या बैठकीत ५७ कोटी ६६ लाख रुपये अतिरिक्त वाढ मंजूर केली. विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जयस्वाल, आ. प्रकाश गजभिये, आ. समीर मेघे, आ. विकास ठाकरे यांच्यासह वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेणारगेल्या वर्षी जितका निधी मंजूर झाला किमान तितका निधी तरी मिळावा, अशी पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची इच्छा होती. त्यांची ही अडचण मी समजू शकतो. त्यांचे समाधान मी करू शकलो नाही. असे असले तरी नागपूर हे उपराजधानीचे शहर आहे. त्यामुळे येथील विकास कामे बाधित होणार नाही. पोलीस वाहनांसाठी निधी, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रस्त्यांसाठी निधी शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाईल. गेल्या वर्षीपेक्षा अतिरिक्त निधीच्या बाबतीत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहमतीने योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार यांनी सांगितले.नाग नदीसह पिवळी नदीही होणार स्वच्छकेंद्र सरकारच्या मदतीने नाग नदी स्वच्छतेची योजना आहे. यासोबतच पालकमंत्री नितीन राऊत यांनी सुचविल्यानुसार नाग नदीबरोबर पिवळी नदी स्वच्छ करण्यात येईल, यासाठी राज्य शासन निधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यासोबतच नागपूर शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टनेल बांधण्यात येणार आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर योग्य मार्ग काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पाच वर्षांत असा वाढला निधीमाजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीत सातत्याने वाढ झाली. ती पुढीलप्रमाणे आहे.वर्ष                   डीपीसी मंजूर निधी२०१४-२०१५      १७५ कोटी२०१५-२०१६      २९० कोटी२०१६-२०१७      ३५० कोटी२०१७-२०१८      ४५० कोटी२०१८-२०१९      ५५२ कोटी

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधीnagpurनागपूर