महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करणार - गडकरी

By Admin | Updated: May 16, 2014 19:40 IST2014-05-16T18:49:39+5:302014-05-16T19:40:59+5:30

नागपूरच्या जनतेने दिलेला कौल हा विकासाचा कौल आहे़ त्यासाठी मी नागपूरच्या जनतेचे आभार मानतो़....

Maharashtra's voice will be elevated in Delhi: Gadkari | महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करणार - गडकरी

महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करणार - गडकरी

नागपूर : नागपूरच्या जनतेने दिलेला कौल हा विकासाचा कौल आहे़ त्यासाठी मी नागपूरच्या जनतेचे आभार मानतो़ मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत काम करेल व राज्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व निर्णय दिल्ली दरबारी कसे घेतले जातील यासाठी मी प्रयत्न करेल़ भाजपने नेहमी विकासाचे राजकारण केले आहे़ त्यामुळे या देशातील कुठल्याही जाती, धर्म, पंथाच्या नागरिकांना कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही़ निवडणुकीआधी माझ्यावर अनेक आरोप झालेत़ परंतु ते सर्व आरोप निराधार ठरले आहेत़ असे खोटेनाटे आरोप करणार्‍यांचा या निवडणुकीत नागपूरच्या जनतेने बॅण्ड वाजवला आहे़ मी पक्षाला कधीही काही मागितलेले नाही व कुठले पद मिळावे म्हणून आपला बायोडाटा घेऊन वरिष्ठांमागे फिरलो नाही़ त्यामुळे आताही मी पक्षाला स्वत:साठी काही मागण्याचा प्रश्नच नाही़ भाजपाध्यक्ष म्हणून राजनाथसिंग चांगले काम करीत आहेत़ अशा स्थितीत माझ्या नावाच्या चर्चेला काहीच अर्थ उरत नाही़ मला पुन्हा पक्षाध्यक्ष व्हायचे नाही़ नव्या सरकारमध्ये माझी भूमिका काय असेल याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनाच घ्यायचा आहे़
 

महाराष्ट्रात परतणार नाही
यापुढे मी राष्ट्रीय राजकारणातच काम करणार आहे़ त्यामुळे राज्याच्या राजकारणात परतण्याचा प्रश्नच नाही़ महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय भाजपा-सेनेच्या राज्यातील नेत्यांनी संख्या बळाच्या आधारावर घ्यायचा आहे व ते हा विषय अत्यंत कुशलतेने हाताळतील याचा मला पूर्ण विश्वास आहे़

Web Title: Maharashtra's voice will be elevated in Delhi: Gadkari