maharashtra vidhan sabha 2019 Maharashtra Election Dates Announced | Vidhan Sabha 2019 : इलेक्सन डिक्लेर झालं बावा एकदाचं...
Vidhan Sabha 2019 : इलेक्सन डिक्लेर झालं बावा एकदाचं...

कार्यकर्ता- 1 : (आमदारांच्या संपर्क कार्यालयात बसून) सांगत होतोना. शनिवारला इलेक्सन डिक्लेर होणार...म्हणून...झालंना. आपला अंदाज वाया नाही जात. मागच्याही येळेला असाच अंदाज केला होता. डिक्टो उतरला.

कार्यकर्ता- 2 : काही खरं नाही बावा यावेळा. पोजीशन टाईट राहणाराय. पहिलंतर तिकीट मिळतंकी नाही, तेच पाहावंलागल. कारण आमदार साहेबापेक्षा त्यांच्याहून चांगलं कामं केल्यालेने ते रांगेत हायेत. निवडून यायचं तर दूरच, तिकिटाचंच टेन्शन दिसतंय मला. मुंबईत तळ ठोकून आहेत साहेब.

कार्यकर्ता- 1 : फेकू नको. आपल्याच आमदाराला तिकिट मिळणार हे नक्की आहे. कन्फर्म झालंय. त्यांना शब्दही मिळालाय. आता सेटिंग तेवढी बाकी आहे. ते झालं की अन् पितृपक्ष संपला की प्रचार सुरू. इलेक्सनचं टेन्शन नाही त्यांना. कारण सर्व कामं यंदाच्या वर्षात कम्प्लिट करून त्यांनी मतदारांना जिकून टाकलंय.

कार्यकर्ता- 2 : मला नाही वाटत. कारण त्या नेत्याला याच पक्षाचं तिकिट मिळणार, अशी आतल्या गोटातली माहिती आहे. मी कालच तिकडं जाऊन आलं. पुरा तयारीला लागलेत ते. कारण त्यांनाही शब्द मिळालाय.

कार्यकर्ता- 1 : कुठून आणतोगा या बातम्या तू. आता पाहा...लिस्टमध्ये नाव कुणाचंय.

राजकारणात असंच असतं. तिकिट देतो.. देतो म्हणून झुलवलं जातं. शेवटी निवडून येणाऱ्यालाच ते मिळतं. भाऊ इलेक्सन आहे.. आता डिक्लेर झालंय. पाच वर्षानंतर आपलंही नशिब फळफळतं. नाहीतर कुठं हात धुवून घ्यायला मिळतं. ते सोड... प्रचाराच्या तयारीला लाग!इलेक्सन डिक्लेर झालं बावा एक दाचं...

 


Web Title: maharashtra vidhan sabha 2019 Maharashtra Election Dates Announced
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.