शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

Maharashtra Gram Panchayat Election Results;  नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा झेंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 15:25 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यातील विजयानंतर नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने भाजपाला ग्रा.पं.निवडणुकीतही धक्का दिला आहे.

ठळक मुद्देनागपूर ग्रामीण, हिंगणा आणि  कामठी तालुक्यात भाजपाची सरशी आजी-माजी मंत्र्यांनी गाव राखलेजि.प.च्या विरोधी पक्ष नेत्याला धक्का 

 जितेंद्र ढवळे  

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यातील विजयानंतर नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने भाजपाला ग्रा.पं.निवडणुकीतही धक्का दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रा.पं.चे निकाल जाहीर झाले आहे. यात महाविकास आघाडी समर्थीत पॅनेलने दमदार यश मिळविले आहे. भाजपा समर्थित पॅनेलला कामठी, नागपूर ग्रामीण आणि हिंगणा तालुक्यात यश मिळाले आहे.  सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रा.पं.यावेळीही राखण्यात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना यश आले आहे. येथे १७ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १४ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस समर्थित पॅनेलला १३ तर भाजप समर्थित पॅनेलला एका जागेवर यश मिळाले आहे.

 कामठी तालुक्यातील कोराडी ग्रा.पं.राखण्यात भाजपाचे महामंत्री, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे. येथे भाजपा समर्थित आर्दश ग्राम निर्माण आघाडीचा १७ पैकी १२ जागावर तर महाविकास आघाडीचा ५ जागांवर विजय झाला आहे. गतवेळी येथे भाजप समर्थित पॅनेलने १७ पैकी १७ जागावर विजय मिळविला होता. यावेळी कोराडीत काँग्रेसचे जि.प.सदस्य नाना कंभाले यांनी भाजपला काहीसा धक्का दिला आहे. कळमेश्वर तालुक्यात ५ पैकी ४ जागावर काँग्रेस समर्थित पॅनेलचा विजय झाला आहे. येथे सोनपूर (आदासा) ग्रा.पं.निवडणूक बिनविरोध झाली होती. येथे सोनेगाव ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-७, भाजपा-२, कोहळी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-७, भाजपा-२ आणि दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. सेलू ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-५ तर भाजपा-४ आणि सावंगी ग्रा.प.मध्ये काँग्रेसच्या तिन्ही गटाला यश मिळाले आहे. रामटेक तालुक्यात ९ पैकी ७ ग्रा.पं.वर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.

 नरखेड तालुक्यातील १७ ग्रा.पं.च्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (महाविकास आघाडीने) मुंसडी मारली आहे. येथे महाविकास आघाडीला १५ तर भाजपाला २ ग्रा.पं.मध्ये यश मिळाले आहे. माणिकवाडा ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादी समर्थित पॅनेलचा ९ पैकी ६ जागावर विजय झाला आहे. येथे मदना ग्रा.पं.त शिवसेना समर्थित पॅनेलला यश मिळाले आहे. येथे ग्रामविकास आघाडीला ६ तर ग्राम परिवर्तन पॅनेलला एका जागेवर यश मिळाले आहे. जामगाव (खुर्द) ग्रा.पं.वर भाजपाने राष्ट्रवादी समर्थीत पॅनेलवर ८-१ विजय मिळविला आहे. जामगाव ग्रा.पं.मध्ये भाजप समर्थित पॅनेलने राष्ट्रवादी समर्थित ग्राम विकास आघाडीवर ८-१ विजय मिळविला आहे. सिंजर ग्रा.पं.मध्ये भाजप-शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या ग्रामविकास आघाडीवर ४-३ ने विजय झाला आहे. सायवाडा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी समर्थित पॅनेलचा भाजप समर्थित पॅनेलचा ६-३ ने विजय झाला आहे. येरला इंदोरा ग्रा.पं.मध्ये परिवर्तन पॅनेलने जनजागृती पॅनेलवर ४-३ ने विजय मिळविला आहे. हे दोन्ही गट महाविकास आघाडीचे आहेत. महेंद्री ग्रा.पं.मध्ये जनशक्ती पॅनेलचा ग्राम विकास आघाडीवर ६-१ विजय झाला आहे. देवग्राम ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित पॅनेलने भाजपाच्या ग्राम विकास परिवर्तन पॅनेलवर ८-१ ने विजय मिळविला आहे. 

नागपूर ग्रामीण तालुक्यात महाविकास आघाडीला चांगली कामगिरी करता आली नाही. तालुक्यात ११ ग्रा.पं.पैकी भाजपा (५), काँग्रेस (४), वंचित बहुजन आघाडीला एका ग्रा.पं.त यश मिळाले आहे. येथे बोलथी ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित ग्राम विकास आघाडी पॅनेलचा ९ तर महाविकास आघाडी समर्थित पॅनेलचा ६ जागावर विजय झाला आहे. सोनेगाव निपाणी ग्रा.पं.वर काँग्रेस समर्थित पॅनेलचा १६ तर भाजप समर्थित पॅनेलचा एका जागेवर विजय झाला आहे. सोनेगाव निपाणी येथील सत्ता कायम राखण्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील यांना यावेळीही यश आले आहे.  येथे दवलामेटी ग्रा.पं.च्या १७ जागावर वंचित बहुजन आघाडी समर्थित पॅनेलला ७, भाजपा समर्थित पॅनेलला (५), कॉँग्रेस समर्थित पॅनेलला (३) तर दोन जागावर अपक्ष उमेदवारांना यश मिळाले आहे. सुराबर्डी ग्रा.पं.च्या ९ पैकी ९ जागावर भाजपा समर्थित गटाला यश मिळाले आहे. दृगधामना ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाचे ७ तर भाजपा समर्थित गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. पेठ कालडोंगरी ग्रा.पं. ८ जागावर कॉँग्रेस समर्थित पॅनेलचा दमदार विजय झाला आहे. 

  सावनेर तालुक्यात खुबाळा ग्रा.पं.च्या ९ जागापैकी ६ जागावर काँग्रेस समर्थित पॅनेल तर ३ जागावर भाजपा समर्थित पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. येथे माजी सरपंच यादव ठाकरे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. टेंभूरडोह ग्रा.पं.मध्ये कॉँग्रेस समर्थित गटाने ७ जागावर विजय मिळविला आहे. सोनपूर ग्रा.पं.च्या ७ पैकी ५ जागावर काँग्रेस समर्थित, एका जागेवर भाजपा समर्थित तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. कामठी तालुक्यात महालगाव ग्रा.पं.च्या निकालात काँग्रेस समर्थीत गटाचे ४, भाजप समर्थीत गटाचे ३ तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांना काँग्रेसने धक्का दिला आहे.

भांदेवाडा ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित आदर्श महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. केसोरी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित पॅनेलने ७ ही जागावर विजय मिळविला आहे. खेडी ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीचे ९ तर काँग्रेस समर्थित पॅनेलचा एका जागेवर विजय झाला आहे. टेमसना ग्रा.पं.मध्ये कॉँग्रेस समर्थित आघाडीचे ६, काँग्रेस बंडखोर गटाचे ३ उमेदवार विजयी झाले आहे. येथे भाजपा समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीला एकाही जागेवर यश मिळाले नाही. घोरपड ग्रा.पं.मध्ये भाजपा समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीचे ९ ही उमेदवार विजयी झाले आहे.

हिंगणा तालुक्यात सातगाव ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी समर्थित पॅनेलचा ७, भाजपा समर्थित पॅनेल (५), वंचित बहुजन आघाडी (२) तर एका जागेवर ईश्वर चिठ्ठीत भाजपा समर्थित पॅनेलच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. पारशिवनी तालुक्यात दहाही ग्रा.पं.वर महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले आहे. पारशिवनी तालुक्यातील बोरी (सिंगारदीप) ग्रा.पं.वर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. येथे सेना (३), काँग्रेस (३) आणि भाजपाचा (१) जागेवर विजय झाला आहे. खेडी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित पॅनेलला ६ तर भाजप समर्थित पॅनेलचा तीन जागावर विजय झाला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक