Maharashtra CM : अजित पवारांना जनता माफ करणार नाही : अनिल देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:56 IST2019-11-23T22:55:04+5:302019-11-23T22:56:07+5:30
सर्व शंकाकुशंकांना दूर सारत आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी उचललेले पाऊल हे अयोग्य असून त्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Maharashtra CM : अजित पवारांना जनता माफ करणार नाही : अनिल देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारचा दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख हे कुणाच्या बाजूने उभे राहणार हा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु सर्व शंकाकुशंकांना दूर सारत देशमुख यांनी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी उचललेले पाऊल हे अयोग्य असून त्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अजित पवारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय निषेधार्हच आहे. त्यांनी उचललेल्या पावलाला राष्ट्रवादी कॉंग्रेसची अजिबात मान्यता नाही. नागपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते व नेते हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व शरद पवारांसोबतच आहेत. काहीही झाले तरी आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.