शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 22:48 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री पत्नी अमृता व आई सरिता यांच्यासह पोहोचले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री पत्नी अमृता व आई सरिता यांच्यासह पोहोचले.लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व आहे. प्रत्येकाच्या उमेदवारांकडून आशाआकांक्षा असतात. त्याची पूर्तता व्हावी यासाठी योग्य उमेदवाराला मत देणे आवश्यक असते. मतदानाचे कर्तव्य सर्वांनी बजावलेच पाहिजे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री येणार म्हणून त्या कालावधीत केंद्रावर जास्त प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी मतदार केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी वाहनेदेखील १०० मीटर अंतरावर पार्क करण्याचे निर्देश दिले होते. तेथून ते पायीच चालत गेले.मी ‘सीएम’ची आई, काम चांगलेच वाटतेयावेळी मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस यांनीदेखील मतदान केले. सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या कामासंदर्भात त्यांना विचारले असता मी मुख्यमंत्र्यांची आई आहे. इतर मातांप्रमाणे मलादेखील मुलाचे काम चांगलेच वाटते. विशेष म्हणजे जनतेसमोरदेखील विकासाची कामे दिसून आली आहेत, असे त्या म्हणाल्या.राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांचेदेखील मतदान 

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनीदेखील वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी ९ च्या सुमारास कुटुंबीयांसह मतदान केले. विशेष म्हणजे राज्यपाल असूनदेखील पुरोहित हे मतदानासाठी रांगेत लागले होते. मतदान करून बाहेर निघाल्यानंतर पुरोहित यांनी सर्वांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले. नागपुरातील वातावरण आल्हाददायक आहे. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी बाहेर निघावे. लोकशाहीत मतदान करणे हे सर्वांचे कर्तव्य. १०० टक्के मतदान झाले पाहिजे. त्यामुळे संविधान आणखी मजबूत होईल, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस