शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Maharashtra Assembly Election 2019 : परदेशातूनही फडणवीस यांच्यासाठी होतोय प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 10:18 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात प्रचारात व्यस्त असून, त्यांच्या कार्याने प्रभावित कार्यकर्ते स्वत:हून त्यांच्यासमवेत येत आहेत. केवळ राज्यातच नव्हे तर अगदी सातासमुद्रापलीकडेदेखील फडणवीस यांच्यासाठी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे.

ठळक मुद्देअमेरिकेत विशेष मेळाव्याचे आयोजन : ‘सोशल मीडिया’वरदेखील ‘एनआरआय’ सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात प्रचारात व्यस्त असून, त्यांच्या कार्याने प्रभावित कार्यकर्ते स्वत:हून त्यांच्यासमवेत येत आहेत. केवळ राज्यातच नव्हे तर अगदी सातासमुद्रापलीकडेदेखील फडणवीस यांच्यासाठी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. अमेरिकेत तर अनिवासी भारतीयांपर्यंत फडणवीस सरकारची कामे पोहोचविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय अनेक अनिवासी भारतीय तेथून फडणवीस यांच्या कामाचा प्रचार-प्रसार करीत आहेत.कॅलिफोर्निया येथील मिल्पिटास येथे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मागील पाच वर्षांत झालेल्या कामांवर प्रकाश टाकण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र मंडळासह विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते. याशिवाय लॉस एंजेलिस, न्यू जर्सी, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, होस्टन, ऑस्टिन येथेदेखील अशाप्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांची कार्यप्रणाली तसेच राज्याचा बदललेला चेहरा यावरदेखील यात चर्चा झाली.‘महाराष्ट्र मॉडेल’ची चर्चा‘एनआरआय’मध्ये निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर चर्चा घडवून आणण्यात आली. यात प्रशासकीय कामासंदर्भात ‘महाराष्ट्र मॉडेल’चे कौतुक झाले. मागील पाच वर्षांत राज्याची प्रगती झाली असून राज्य सुरक्षित झाले आहे. याशिवाय पायाभूत सुविधांचा विकास होत असल्याने गुंतवणूक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मत ‘एफआयआयडीएस’चे (फाऊंडेशन ऑफ इंडिया अ‍ॅन्ड इंडियन डायस्पोरा स्टडीज) संचालक खंडेराव कांड यांनी व्यक्त केले.‘सोशल मीडिया’वर राज्याची महतीदेवेंद्र फडणवीस यांची विदेशामध्ये चांगली प्रतिमा आहे. त्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामगिरीच्या आधारावर विदेशात असलेले महाराष्ट्रातील अनेक तरुण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून राज्याची महती जगापर्यंत पोहोचवत आहेत, अशी माहिती नॉर्दन कॅलिफोर्निया येथे वास्तव्याला असलेले आयटी तंत्रज्ञ गौरव पटवर्धन यांनी दिली. अनेक तरुणांनी तर फडणवीस यांच्या कामावर प्रकाश टाकणारे ‘व्हिडीओ’, ‘ग्राफिक्स’ तयार केले आहेत. ते ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील मित्रमंडळीपर्यंत पोहोचविण्यार भर देण्यात येत आहे. अनेक जण तर कुठल्याही पक्षाशी जुळलेले नाहीत. परंतु राज्याच्या विकासासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे, असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रकाश टाकण्यासाठी अमेरिकेत आयोजित सभा

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AmericaअमेरिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस