शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 8:53 PM

डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देविरोधकांमध्ये वैचारिक गोंधळ असल्याची टीका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संपुआ शासनकाळात शासकीय प्रणालीतून ‘फोनबँकिंग’ची वेगळीच व्यवस्था सुरू झाली. फोनवरच अनेकांची मोठमोठाली कर्ज मंजूर झाली. यातून बँकांच्या विविध घोटाळ्यांना सुरुवात झाली. डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.या पत्रपरिषदेला माजी खासदार अजय संचेती, आ.गिरीश व्यास, आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, प्रदेश प्रवक्ता अर्चना डेहनकर, संजय भेंडे, शहर प्रचारप्रमुख चंदन गोस्वामी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकांत एक नवा इतिहास रचला जाणार आहे. महायुतीला २२१ हून अधिक जागा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहेच. शिवाय काँग्रेस व विरोधकांची वैचारिक दिवाळखोरीदेखील सर्वांसमोर आली आहे. विविध मुद्यांवर विरोधकांचा गोंधळ आहे व ते नेमके कुठल्या बाजूला आहे हेच त्यांना सांगता येत नाही. ‘एनआरसी’संबंधात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच पुढाकार घेतला होता व आता काँग्रेसचेच नेते ‘एनआरसी’ला विरोध करत आहेत. ‘जीएसटी कॉन्सिल’मध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत व ते बैठकीत एकमताने काम करतात. बाहेर जाऊन मात्र ‘गब्बर सिंह टॅक्स’ असे म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेक पक्ष सांभाळतात असे एकेकाळी म्हटले जायचे. आज त्यांना स्वत:चा पक्षदेखील सांभाळता येत नाही अशी स्थिती आहे, असे जावडेकर म्हणाले. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावरदेखील आरोप केले. ‘पीएमसी’ बँक भ्रष्टाचारात पटेल यांच्या सहभागाचीदेखील चौकशी झाली पाहिजे. विदेशी विमान कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी ‘एअर इंडिया’ला त्यांनीच रसातळाला नेले, असे ते म्हणाले. विदर्भाला मागील पाच वर्षांपासून न्याय मिळत असून विकासाची गंगा वाहते आहे. अशा स्थितीत वेगळ््या विदर्भाचा विषय मागे पडला आहे. मात्र विदर्भाबाबत जनसंघापासून आमची भूमिका स्पष्ट आहे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.राष्ट्रवाद हा निवडणुकांचा मुद्दा असेलचराष्ट्रवादाचा मुद्दा हा निवडणुकांत अगोदरही होता व पुढेदेखील असेलच. सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात काँग्रेस नेते विनाकारण वक्तव्य देत आहेत. सावरकर यांच्यासंबंधात काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्याच पक्षाचा इतिहास तपासावा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले होते. तर सी.राजगोपालाचारी यांनी पुस्तक लिहीले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Javadekarप्रकाश जावडेकरMediaमाध्यमे