शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

महा मेट्रो : महत्त्वाच्या कार्यांना मंजुरी, सीएमआरएसची प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:34 AM

शहरात मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी महामेट्रो पूर्णपणे तयार असल्याचे रेल्वे बोर्ड आणि आरडीएसओच्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे. नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी आरडीएसओने अनेक महत्त्वाच्या बाबींना मान्यता प्रदान केली आहे. यामुळे रिच-१ कॉरिडोर अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनपर्यंत आणि रिच-३ अंतर्गत सुभाषनगर ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन दरम्यान होणाऱ्या प्रवासी सेवेचा शुभारंभ करण्यासाठी मेट्रो प्रशासन तयारीला लागले आहे.

ठळक मुद्दे‘रेल्वे बोर्ड व आरडीएसओ’चे परीक्षण अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी महामेट्रो पूर्णपणे तयार असल्याचे रेल्वे बोर्ड आणि आरडीएसओच्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे. नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी आरडीएसओने अनेक महत्त्वाच्या बाबींना मान्यता प्रदान केली आहे. यामुळे रिच-१ कॉरिडोर अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनपर्यंत आणि रिच-३ अंतर्गत सुभाषनगर ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन दरम्यान होणाऱ्या प्रवासी सेवेचा शुभारंभ करण्यासाठी मेट्रो प्रशासन तयारीला लागले आहे.आरडीएसओने दिलेल्या मंजुरीनुसार रिच-३ अंतर्गत येत असलेल्या लोकमान्यनगर ते सुभाषनगर मेट्रो स्टेशनदरम्यान नागपूर मेट्रोचा प्रवासी वेग ताशी २५ कि.मी. निर्धारित करण्यात आला आहे. या दोन्ही स्टेशनमधील अंतर ५.६ कि.मी. इतके असून अप अ‍ॅण्ड डाऊन ट्रॅकवरदेखील हा वेग कायम राहणार आहे. याव्यतिरिक्त महामेट्रो नागपूरच्या २५ केव्ही एसी ट्रॅक्शन, विद्युत पुरवठा आणि स्कॅडा सिस्टीमला (सुपरवायजरी कंट्रोल आणि डेटा अ‍ॅक्विजिशन) मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.रिच-१ अंतर्गत येणाऱ्या अ‍ॅटग्रेड सेक्शनवर खापरी ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनदरम्यान नागपूर मेट्रो ट्रेनला ताशी ८० कि.मी. गतीला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तसेच खापरी स्टेशन ते काँग्रेसनगरदरम्यान अप आणि डाऊन ट्रॅकवर प्रारंभिक ऑक्सिलेशन ट्रायलसाठी ताशी ४० कि.मी. आणि इमर्जन्सी ब्रेकिंग डिस्टेंस (ईबीडी) ट्रायल्ससाठी ताशी ४५ कि.मी. गती नागपूर मेट्रोला प्रदान करण्यात आली आहे.महामेट्रोच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ताशी ८० आणि ४० कि.मी. वेगासाठी गती प्रमाणपत्र आणि विविध वैशिष्ट्यांसाठी तांत्रिक मान्यतादेखील मिळाली. रिच-१ आणि रिच-३ या दोन्ही भागांमध्ये ऑक्सिलेशन ट्रायल केले जात आहे. आरडीएसओतर्फे मिळालेल्या परवानगीनंतर आता महामेट्रो सीएमआरएस (कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी) परीक्षणासाठी सुसज्ज झाले आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर