Love made a thief: stealing to pamper his beloved | कंबख्त इश्क ने चोर बना दिया : प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी चोरी

कंबख्त इश्क ने चोर बना दिया : प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गर्लफ्रेण्डला बाईकवर फिरवण्यासाठी आणि आयफोन गिफ्ट देण्यासाठी चोऱ्या करणाऱ्या युवकास अंबाझरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून चोरीची बाईक व ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. सचिन पुंडलिकराव अतकरी (१९) रा. शिवाजी पार्क, रामनगर असे आरोपीचे नाव आहे.

सचिनचे वडील चौकीदारी करतात. तर आई मोलकरणीचे काम करते. सचिन आवारा प्रवृृत्तीचा मुलगा आहे. बजाजनगर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीसोबत त्याची मैत्री आहे. त्याच्या मैत्रिणीला बाईकवर फिरणे व आयफोन ठेवण्याचा शौक आहे. ती नेहमी सचिनला बाईकवर फिरवण्यासाठी हट्ट करायची. कमाईचे कुठलेही साधन नसल्याने सचिन चोरी करू लागला. तो बाईक चोरी करून गर्लफ्रेण्डला फिरवायचा. नंतर ती बाईक विकायचा. यातून मिळालेल्या रकमेतून त्याने गर्लफ्रेण्डला मोबाईल विकत घेऊन दिला. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.

अंबाझरी पोलिसांना सचिन वेगवेगळ्या दुचाकीचा वापर करीत असल्याचे समजले. या आधारावर त्याला पकडण्यात आले. ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याजवळून बाईक व ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. ही कारवाई पीआय नरेंद्र हिवरे, राहुल शिरे, एएसआय दीपक अवचट, शारदा मिश्रा, कर्मचारी विजय शिंदे, योगराज कोकाटे, महेश मेहर आणि विजय गिरी यांनी केली.

Web Title: Love made a thief: stealing to pamper his beloved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.