धक्कादायक! प्रेमीयुगलाची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या

By जितेंद्र ढवळे | Published: September 5, 2023 02:35 PM2023-09-05T14:35:35+5:302023-09-05T14:36:35+5:30

पारशिवनी तालुक्यातील पेंढरी येथील घटना

love couple committed suicide by hanging themselves with the same rope | धक्कादायक! प्रेमीयुगलाची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! प्रेमीयुगलाची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंढरी येथे एका महाविद्यालयीन प्रेमी युगलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गौरव राजेंद्र बघमारे (१८) आणि जानव्ही जीवन नायले (१८) दोघेही रा.पेंढरी अशी मृतांची नावे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार गौरव हा सावनेर येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता तर जानव्ही पारशिवनीच्या हरिहर महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. गत वर्षभरापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. पेंढरी गावात एक पडके घर आहे. या घरात मंगळवारी (दि.५) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास या दोघांचे मृतदेह आढळून आले. या दोघांनी एकाच दोराला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पारशिवनी पोलिसांनी दिली. 

प्राथमिक माहितीनुसार या दोघांच्या प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असे सांगितले जात आहे. सोमवारी (दि.४) या दोघांचे मोबाईलवर संभाषण झाल्याची माहिती आहे. दोघांनी मध्यरात्री आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केले आहेत.

Web Title: love couple committed suicide by hanging themselves with the same rope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.