बांधकाम साहित्य पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:12 IST2021-09-16T04:12:26+5:302021-09-16T04:12:26+5:30

माैदा : घराच्या बांधकामाकरिता आणून ठेवलेले २४ हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य अज्ञात चाेरट्याने चाेरून नेले. ही घटना माैदा ...

Looted construction materials | बांधकाम साहित्य पळविले

बांधकाम साहित्य पळविले

माैदा : घराच्या बांधकामाकरिता आणून ठेवलेले २४ हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य अज्ञात चाेरट्याने चाेरून नेले. ही घटना माैदा पाेलीस ठाण्यांतर्गतच्या व्यंकटेशनगर, पावडदाैना राेड माैदा येथे मंगळवारी (दि.१४) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

शरद नत्थूजी देशमुख (४२, रा. स्टेट बॅंकेजवळ, माैदा) यांच्या घराचे बांधकाम व्यंकटेशनगर येथे सुरू असून, त्यांनी बांधकामासाठी खिडकी, लाेखंडी ग्रिल व सिमेंट आणून ठेवले हाेते. दरम्यान साेमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चाेरट्याने बांधकाम साहित्य ठेवलेल्या खाेलीचे कुलूप ताेडून तेथील खिडकीचे आठ नग किंमत १६ हजार रुपये, आठ हजार रुपये किमतीच्या आठ सिमेंट बॅग असा एकूण २४ हजार रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. याप्रकरणी शरद देशमुख यांच्या तक्रारीवरून माैदा पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस हवालदार चांगदेव कुथे करीत आहेत.

Web Title: Looted construction materials