लोकसभेच्या घटनेचे नागपुरात पडसाद; विधानपरिषदेत अभ्यागतांना प्रवेश बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 14:02 IST2023-12-13T14:01:36+5:302023-12-13T14:02:53+5:30
ही घटना कारणावर आल्यानंतर सभागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा तत्काळ आढावा घेण्यात आला.

लोकसभेच्या घटनेचे नागपुरात पडसाद; विधानपरिषदेत अभ्यागतांना प्रवेश बंद
योगेश पांडे
नागपूर : लोकसभेतील गॅलरीतून सभागृहात शिरत गोंधळ घालण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात देखील उमटले आहेत. विधान परिषदेच्या गॅलरीत या अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देऊ नये असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
दरम्यान ही घटना कारणावर आल्यानंतर सभागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा तत्काळ आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित सुरक्षा रक्षकांना कडेकोट तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही घटना गंभीर आहे. विधानपरिषदेतील गॅलरी पासेस आजपासून बंद करण्यात येत आहेत. अभ्यागतांना सभागृह गॅलरीत प्रवेश मिळणार नाही. आमदारांनी पासेसबाबत पत्र जारी करू नये असे निर्देश उपसभापतींनी दिले.