शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:53 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे गुरुवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देसंविधान चौक : राज्य व केंद्र सरकारचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे गुरुवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.पक्षाचे विदर्भ अध्यक्ष सतीश लोणारे, प्रवक्ता तन्हा नागपुरी यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी विदर्भ राज्य स्थापन न करणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या विरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. यासोबतच कोरेगाव भीमा येथील हल्लेखोर भिडे-एकबोटे यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पाठवण्यात आले.आंदोलनात रवी त्रिपाठी, प्रेमकुमार मिश्रा, रंजीत साह, वैभव गुप्ता, चंद्रशेखर बरमाटे, अशफाक रहमान, क्लॉडियस पीटर, राहुल थोरात, नाना गजभिये, आनंद कालपांडे आदी कार्यकर्ते व पदादिकारी सहभागी होते.विदर्भाबाबत भाषिकवाद हा खोडसाळपणा - श्रीहरी अणेशरद पवार यांनी विदर्भाची मागणी काही हिंदी भाषिक लोक करीत असल्याचे वक्तव्य करून एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. याबाबत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘विदर्भाबाबत हिंदी-मराठी भाषिकांच्या वर्चस्वाचा वाद’ हा खोडसाळ व पद्धतशीरपणे गैरप्रसार करणारा आहे. विदर्भात हिंदी व मराठी लोकच नव्हे तर बंगाली, छत्तीसगडी, तेलंगी, गोंडी व मारवाडी भाषिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. आम्ही याला आमची समृद्धी समजतो, न्यूनता नव्हे. विदर्भ राज्याची मागणी ही भाषावादावर आधारित नाही. आमच्या मागणीचा थेट संबंध विकासाशी आहे. १९६० ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राचा एकही मराठी भाषिक मुख्यमंत्री विदर्भाचा विकास करू शकला नाही म्हणून आम्हाला विदर्भ राज्य हवे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.शरद पवार हे विदर्भविरोधीचशरद पवार यांची भूमिका ही नेहमीच संदिग्ध असून ते विदर्भविरोधीच राहिलेले आहेत. विदर्भात आले की, ते एक बोलतात आणि विदर्भाबाहेर गेले की दुसरेच बोलतात. सत्तेत असतानाही त्यांनी विदर्भावर अन्यायच केला आहे. त्यांची भूमिका विदर्भविरोधी राहिलेली आहे. यामुळे त्यांच्या पक्षालाही विदर्भात वाव मिळाला नाही. त्यांच्या आताच्या वक्तव्याने हा पक्ष विदर्भातून नामशेष होईल. त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो.राम नेवलेमुख्य संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती

टॅग्स :nagpurनागपूरagitationआंदोलन