शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

लाव्हा ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

By admin | Updated: April 8, 2017 02:26 IST

नजीकच्या लाव्हा येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही जलवाहिनी टाकण्यात न आल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली.

पाण्यासाठी आंदोलन : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना कोंडले वाडी : नजीकच्या लाव्हा येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊनही जलवाहिनी टाकण्यात न आल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन करताच ही समस्या १५ दिवसांत सोडविण्याचे प्रशासनाच्यावतीने आश्वासन देण्यात आले. हा काळ पूर्ण होऊनही सदर समस्या ‘जैसे थे’च असल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना कार्यालयातच ओलिस ठेवले. त्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देताच नागरिक शांत झाले. त्यातच शुक्रवारपासून गावाला दोन टँकरने पाणीपुरवठा करायला सुरुवात केली आहे. लाव्हा येथील पाणीसमस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी सुरुवातीला धरणे आंदोलन केले. त्यावेळी ही समस्या १५ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रशासन काहीही हालचाली करीत नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी महादेव नगरातील पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी (दि. २९) पुन्हा आंदोलन केले. त्यावेळी काहींनी पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परिणामी, ही समस्या चार दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. नागरिकांनी त्या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलन मागे घेतले. आठवडा लोटूनही पाणीसमस्या सोडविली जात नसल्याचे लक्षात येताच संतोषीनगर, महादेवनगर, निर्मलनगर, निर्मलउज्वलनगर येथील नागरिक गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. त्यावेळी नागपूर पंचायत समितीचे उपसभापती सुजित नितनवरे, प्रभारी खंडविकास अधिकारी दिलीप कुहिटे, सरंपच जिजा धुर्वे, उपसरपंच रॉबिन शेलारे व ग्रामविकास अधिकारी विकास लाडे कार्यालयात हजर होते. संतप्त नागरिकांनी ही मंडळी आत असतानाच कार्यालयाला कुलूप ठोकले. काही वेळाने नागरिकांनी स्वत: कुलूप उघडून आतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी या समस्येवर चर्चा केली तेव्हा उद्यापासून (शुक्रवार, दि. ७) टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले. परिणामी, शुक्रवारपासून गावात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करायला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात पुरुषोत्तम गोरे, प्रवीण मेश्राम, सचिन पाटील, संदीप गंधारे, भागवत तडोसे, जीवन रुद्रकार, रणजित पांजाण, लता गोरे, वनिता कुंभलकर, सूरज गिरडकर, अंजली चिकने, सुशीला सहानी, दुर्गा बोडखे, गीता गौतम, वर्षा गणवीर, कमला खवसे, रामेश्वर हरणकर, कमला चंदेलकर, शांताबाई खातारकर, सुलभा गणवीर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)