शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

व्हायरल व्हायला जीवावर उदार!" लाईक्सच्या मोहात जीवघेणं थ्रिल आणि धोकादायक स्टंट

By राजेश शेगोकार | Updated: June 30, 2025 13:18 IST

Nagpur : सोशल मीडियाच्या व्यसनातून अनेकांना 'रील'च्या दुनियेची इतकी भुरळ पडली आहे की, त्यातून रिअल लाइफची राखरांगोळी होत आहे, याचे भानही या आभासी दुनियेतील पिढीला नाही.

राजेश शेगोकारनागपूर : झटपट प्रसिद्धीच्या नादात अनेक तरुण-तरुणी जीवाशी खेळणारे स्टंट करत आहेत. ते व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यावर मिळणारे लाइक्स, शेअर्स आणि कमेंट्स हाच आता 'लोकप्रियतेचा मापदंड' झाला आहे, जणू काही आयुष्याचा अंतिम उद्देशच 'व्हायरल' होण्यात आहे! इन्स्टा, फेसबुक, एक्स, व्हॉट्सअॅप ही व्यासपीठं गरज नव्हे तर व्यसन झाली आहेत. सोशल मीडियाच्या व्यसनातून 'रील'च्या दुनियेची इतकी भुरळ पडली आहे की, त्यातून रिअल लाइफची राखरांगोळी होत आहे. विशेष म्हणजे, याचे भानसुद्धा त्यांना नाही. यामध्ये आता अधिकारी अन् पोलिसही मागे नाहीत हे नागपूरसह राज्यभरात समोर आले आहे.

प्रत्येकाच्या हातात आलेला स्मार्टफोन हा अशा माध्यमांवर व्यक्त होण्याचा राजमार्ग आहे. त्यातूनच सोशल मीडियाचे जग हे खूपच सुंदर, मनोवेधक आहे, यावर अशा पिढीचा विश्वास बसला व त्याचे व्यसन कधी लागले हे कोणालाही कळले नाही. सोशल मीडियाचा वापर करणारे भारतात ४६७ दशलक्ष लोक झाले आहेत. ही आकडेवारी तंत्रज्ञानाच्या युगाकडे आपण जात असल्याचा अभिमान निर्माण करणारी असली, तरी याच तंत्रज्ञानाचा वापर नादावल्यासारखा होत आहे. विशेष म्हणजे अनेक अधिकारीही आपले सेवानियम धाब्यावर बसवून रीलच्या मागे लागले आहेत.

तासनतास मोबाइलवर रील्स पाहणाऱ्या पिढीला आता यू ट्यूबवर कमाईचाही मार्ग सापडला आहे. पण त्यासाठी हवाय थोडा थ्रिल - थोडा 'जोखिमांचा तडका' आणि मग निर्माण होते ती 'कर के देख लेंगे' वृत्ती जी थेट आयुष्याशी खेळते. मानसशास्त्र सांगते की, सततची डिजिटल प्रसिद्धी ही मेंदूला सवय लावते. डोपामिन हायजॅकिंग म्हणतात त्याला. एकदा त्या 'हाय'ची चटक लागली की, मग रीलची मजा रिअल जगाच्या शिस्तीला नकोशी वाटते. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि त्यातून उगम पावलेली ही सुंदर पण मोहक आभासी दुनिया आहे.

मुळात प्रश्न असा आहे की, सोशल मीडियावरील हे 'कंटेंट' टिकणार किती? दोन मिनिटं झळकणारं रील आणि मग विसरून जाणारी दुनिया. पण त्या क्षणिक लाईक्ससाठी काही जणांनी कायमचं काही गमावलं आहे. वास्तविकता अशी की, लाईक्स देणारे लोक उद्या अंत्यसंस्कारालाही येणार नाहीता खरंतर डोळ्यांवर पडणारा सततचा स्क्रीन लोड, मानसिक थकवा, एकाकीपणा, नात्यांमधली संवादाची गळती हे आहे रीलच्या मागचं वास्तव.

माणूस आता स्वतःला जगासमोर 'प्रेझेंट' करताना स्वतःपासूनच दूर जातोय. खरंतर सध्या एक आभासी जगदेखील वास्तविक जगाच्या समांतर चालत आहे. त्यामुळे प्रत्येकावर आपले सुख-दुःख इतरांसोबत शेअर करण्याचा अदृश्य दबाव आला आहे असेच जाणवते.यातून निर्माण झाली भावनिक असुरक्षितता, एक दिवस आपली खरी ओळखच गिळून टाकणार तर नाही अशी भीती आहे. वाढलेले शेअरिंग तुमच्या भावनांना कृत्रिम मुलामा देते. लाईक, कमेंट करणारे कदाचित तुम्हाला ओळखतील, पण तुमचे खरे सुखदुःख समजून घेण्यासाठी ही आभासी दुनिया कामाची नाही हे समजलं, तर कदाचित आपण 'रील्स' करताना रिअल लाईफ धोक्यात घालणार नाही. कारण पुढचा बळी... कदाचित तुमच्याच घरातला असू शकतो.

हा नवा इमोशनल व्हायरस

  • सोशल मीडियाचे व्यसन फक्त वेळ आणि ऊर्जा चोखत नाही, तर एक मानसिक आजार देते. यामध्ये आत्मसन्मान म्हणा की मूल्य म्हणा ते आता फॉलोअर्सच्या संख्येवर अवलंबून ठरते.
  • सतत इतरांशी तुलना, सततची अपेक्षा, माझ्या पोस्टला किती लाईक्स? त्याला किंवा तिला इतके फॉलोअर्स का? मला का नाही?
  • हे मानसिक अस्वस्थतेचे मूळ आहेत. FOMO (Fear of Missing Out) फोमो म्हणजे सतत काही तरी हरवण्याची भीती यासारख्या विकारांना चालना देणारा हा नवा 'इमोशनल व्हायरस' आहे.
टॅग्स :nagpurनागपूरSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल