शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अशांतता पसरविणाऱ्यांचा नीट बंदोबस्त करू; गृहमंत्र्यांचा नागपुरात इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 05:59 IST

वळसे-पाटील म्हणाले,  अमरावती, अकोटमध्ये काय घडले याची पोलीस चौकशी करीत आहेत. या भागांत दंगली घडत आहेत. एका विशिष्ट परिसरामध्ये या सर्व घटना घडतात.

नागपूर:  देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात सातत्याने अशांतता पसरविण्याचे काम केले जात आहे. काही लोक त्यात सामील आहेत. अशा लोकांचा योग्य बंदोबस्त केला जाईल, असा सज्जड इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी नागपुरातून दिला. 

पत्रकारांशी बोलताना -वळसे-पाटील म्हणाले,  अमरावती, अकोटमध्ये काय घडले याची पोलीस चौकशी करीत आहेत. या भागांत दंगली घडत आहेत. एका विशिष्ट परिसरामध्ये या सर्व घटना घडतात.  म्हणजे तिथे काही घटक ॲक्टिव्ह आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त स्तरावर बैठक होईल. मग परत एकदा मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ, असेही वळसे-पाटील म्हणाले.

३ मेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज  -कायदा व सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही.  कुठल्याही वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल अशी कोणतीही कृती कारवाईस पात्र ठरते. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.    - दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री 

केंद्राने सुरक्षा देणे हे राज्यावर अतिक्रमण -केंद्र सरकारकडून काहींना सुरक्षा पुरविली जात आहे.  राज्य सरकारच्या सार्वभौम अधिकाराला बाजूला सारून काही व्यक्तींना सुरक्षा पुरविली जाते, हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, अशी टीका त्यांनी केली. 

तेव्हा भाजपने का नाही हटविले भोंगे : तोगडिया -भाजपशासित राज्यांतील भोंग्यांबाबत मौन बाळगून महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा सुरू आहे. सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत, असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, रात्री १० नंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. याचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे.

राज ठाकरेंचे समर्थन भाजपसाठी धोक्याचे : आठवले -मनसेची भूमिका ही अतिहार्ड असून, ही हार्ड भूमिका घेऊन भाजपला फायदा होणार नाही. राज ठाकरे यांचे समर्थन घेणे राजकीय पातळीवर भाजपला महागात पडेल, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येथे मंगळवारी म्हणाले. भाजप आणि मनसेची युती होऊच शकत नाही. रिपाइं पक्ष भाजपसोबत असताना त्यांना मनसेची गरज नाही, असेही ते म्हणाले.

मुंबईत ७२% मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद -राज्यात भोंग्याचा प्रश्न तापला असताना, मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ७२ टक्के मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद केला असल्याची माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnagpurनागपूरRamdas Athawaleरामदास आठवले