गोकुल सोसायटीत बिबट्याचा मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:07 IST2019-12-11T00:07:05+5:302019-12-11T00:07:16+5:30
शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका इसमाला बिबट्या दिसला होता.

गोकुल सोसायटीत बिबट्याचा मुक्काम
नागपूर : शहरालगत असलेल्या आणि गोरेगाव वनक्षेत्राला लागून असलेल्या गोकुल सोसायटीच्या परिसरात बिबट्याने मुक्कम ठोकल्याचे दिसत आहे. गोकुल सोसायटी गोरेवाडा वनक्षेत्राला लागून आहेे. या परिसरात मोकाट कुत्रे असल्याने बिबट्याने या सोसायटी लगतच आपले ठाण मांडले आहे.
शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका इसमाला बिबट्या दिसला होता. त्यानंतर सोमवारी रात्री दीड वाजता पुन्हा एकदा मजुराला सोसायटीमधील इमारतीच्या पार्किंग मधून जाताना दिसला. दोन दिवसात दोन वेळा बिबट्या दिसला. यामुळे या परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.