शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन कायदा विकासाचा ‘राँग नंबर’

By admin | Updated: January 12, 2015 00:58 IST

केंद्र शासनाने अध्यादेश काढून नवीन भूसंपादन कायद्यात केलेल्या सुधारणांना नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी कडाडून विरोध केला आहे.

मेधा पाटकर यांचा विरोध : भाजप जनहितविरोधी असल्याचा आरोपनागपूर : केंद्र शासनाने अध्यादेश काढून नवीन भूसंपादन कायद्यात केलेल्या सुधारणांना नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी कडाडून विरोध केला आहे.जनआंदोलनाच्या राष्ट्रीय आघाडीची बैठक अमरावती रोडवरील सर्वोदय आश्रम येथे रविवारी झाली. बैठकीनंतर मेधा पाटकर यांच्यासह आघाडीच्या इतर नेत्यांनी संशोधित भूसंपादन कायदा उद्योजकांच्या हिताचा, तर शेतकऱ्यांचा विनाश करणारा असल्याचा आरोप केला. तसेच हा कायदा विकासाचा ‘राँग नंबर’ असल्याचे मत व्यक्त करून कायदा रद्द करण्यासाठी देशभरात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.नवीन भूसंपादन कायद्याला भाजपानेच सुरुवातीला विरोध केला होता. सत्तेवर आल्यानंतर त्यांचे धोरण बदलले. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या उद्योजक लॉबीला खूश करण्यासाठी शासनाने तडकाफडकी नवीन कायदा लागू केला. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर अध्यादेश काढून कायद्यात हवे ते बदल करून घेतले. पर्यावरण मंत्रालयाने १०० दिवसांत २५० प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला. हा विकासाचा नाही तर विनाशाचा कायदा आहे. या कायद्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येईल, असे पाटकर यांनी सांगितले.संशोधित कायद्यानुसार शासनाला भूसंपादन करण्यासाठी मालकाच्या परवानगीची गरज नाही. असा कायदा जगात कोठेच नाही. औद्योगिकीकरण व शहरीकरणास विरोध नाही; पण हे सर्व लोकांच्या सहमतीने झाले पाहिजे, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.शासनाने कोणालाही न विचारता सरदार सरोवर प्रकल्पाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अडीच लाख नागरिक विस्थापित होणार आहेत. हा प्रकल्प ९० हजार कोटी रुपयांचा झाला आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती पूर्वी नर्मदा बचाव आंदोलनाच्या समर्थन करीत होत्या. आता त्या ‘गंगा की बेटी’ झाल्या आहेत, अशी खोचक टीका पाटकर यांनी केली. याप्रसंगी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे विलास भोंगाडे, ओडिशा येथील लोकशक्ती अभियानाचे प्रफुल्ल समंतरा, तामिळनाडू येथील असंघटित कामगार महासंघाच्या गॅब्रियल डिट्रिच, छत्तीसगड येथील नदी घाटी मोर्चाचे गौतम बंडोपाध्याय आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वादाच्या आड कायदे पारितशासनाने ‘घर वापसी’ व वादग्रस्त वक्तव्यांवर सर्वत्र चर्चा झडत असताना अनेक जाचक कायदे पारित करून घेतले आहेत, असा आरोप पाटकर यांनी केला. २३ व २४ जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय बैठकीत वादग्रस्त कायद्यांविरुद्धच्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भूसंपादन कायद्यातील सुधारणांसदर्भातील अध्यादेशाच्या प्रती जाळू, असे पाटकर यांनी सांगितले.