शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन केले अन् मोबदलाही परत घेतला

By admin | Updated: June 30, 2015 03:10 IST

‘भामटी- परसोड स्ट्रीट स्कीम’अंतर्गत टाकळी सीम आबादीतील चिंताहर मारोतराव डंभारे यांच्या मालकीचे खसरा क्रमांक २५/४ व

नासुप्रने न्याय द्यावा : भूखंड परत मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाचा संघर्ष कमलेश वानखेडे ल्ल नागपूर‘भामटी- परसोड स्ट्रीट स्कीम’अंतर्गत टाकळी सीम आबादीतील चिंताहर मारोतराव डंभारे यांच्या मालकीचे खसरा क्रमांक २५/४ व २५ /५२ येथील भूखंड क्रमांक १, २ व ३ संपादित करण्यात आले. मात्र, संबंधित जागेवर महापालिकेने संरक्षण भिंत बांधल्याच्या कारणावरून नासुप्रने संबंधित भूखंड नियमित केलेले नाहीत. आपले भूखंड परत मिळविण्यासाठी धरमपेठच्या डॉ. आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक डंभारे नासुप्रच्या चकरा मारत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समाधान शिबिरातही त्यांनी दाद मागितली. मात्र, नासुप्रकडून त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. नासुप्रचे म्हणणे आहे की सध्या या भूखंडांवर महापालिकेने संरक्षण भिंत बांधली आहे व ही जमीन सध्या बुद्धविहाराच्या ताब्यात आहे. महापालिकेने या जागेवर भिंतीचे बांधकाम केले असल्यामुळे संबंधित भूखंड आता नियमित होऊ शकत नाही, असे नासुप्रचे म्हणणे आहे. महापालिकेच्या संरक्षण भिंतीमुळे संबंधित भूखंडांचे नियमितीकरण होऊ शकले नाही. मात्र, भूखंड नियमित करण्यास महापालिकेने कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. उलट याबाबतचे सर्व अधिकार नासुप्रला दिलेले आहेत. डंभारे यांनी संबंधित भिंत तोडण्यासाठी महापालिकेचे कार्यकारी अभियंता (स्लम) यांच्याकडे नोव्हेंबर २०११ मध्ये विनंती अर्ज केला होता. त्यावार महापालिकेने या जागेचा ताबा नासुप्रकडे असल्याचे सांगत त्यांनी आपल्या स्तरावर तोडगा काढावा, मनपातर्फे काहीही हरकत राहणार नाही, असा अभिप्राय दिला होता. यानंतर २९ डिसेंबर २०१४ रोजी नासुप्रने टाकळी सीम बुद्धविहार कमिटीला वरील जागेचे मालकी हक्काबाबतचे पंजीबद्ध दस्तावेज सादर करण्यासाठी पत्राद्वारे कळविले. मात्र, बुद्धविहार कमिटीने अद्याप दस्तावेज सादर केलेले नाहीत. मात्र, यानंतरही नासुप्र संबंधित भूखंडांवर निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. नासुप्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यावेळी संबंधित भूखंड संपादित करण्यात आले. त्यामुळे संबंधित भूखंड ‘सी. एम. फाम्युर्ला’ अंतर्गत नियमित करून देण्यासाठी नासुप्रने १६ फेब्रुवारी १९८४ रोजी डंभारे यांना पत्र दिले. या पत्रातील अटीप्रमाणे डंभारे यांनी अवॉर्डवर स्वाक्षरी केली व भूखंडाचा ताबा नासुप्रला दिला. सोबतच मिळालेली मोबदल्याची रक्कमही नासुप्रमध्ये जमा करण्यात आली. त्याची पावतीही देण्यात आली. सद्यस्थितीत डंभारे यांच्या हातून त्यांचे तिन्ही भूखंडही गेले आहेत व या भूखंडांचा मिळालेला मोबदलाही गेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भूखंड परत मिळविण्यासाठी डंभारे यांचा संघर्ष सुरू आहे. मात्र, नासुप्रची यंत्रणा त्यांचे ‘समाधान’करण्यात पुढाकार घेताना दिसत नाही.