शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कमिशनचा हव्यास लाखोंची देयके प्रलंबित

By admin | Updated: August 5, 2014 01:04 IST

मेडिकल व सुपर रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची लाखोंची देयके केवळ कमिशनसाठी अडविली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच्या विरोधात काही

औषधांच्या देयक मंजुरीसाठी २ ते ५ टक्के कमिशन : पुरवठादारांची तक्रारनागपूर : मेडिकल व सुपर रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची लाखोंची देयके केवळ कमिशनसाठी अडविली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच्या विरोधात काही पुरवठादारांनी थेट वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.मेडिकल, सुपर व मेयो या शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी विविध खाजगी पुरवठादारांकडून औषधांचा पुरवठा होतो. दर महिन्याला लाखोंची औषधी रुग्णालयांना पुरविली जाते. औषध पुरविल्यानंतर मेडिकलमधून देयके निघतात आणि ती मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयात पाठविण्यात येतात. साधारणत: दोन महिन्यात देयके मंजूर होण्याची प्रक्रिया असते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, देयकांचे आॅर्डर काढणाऱ्याला ५ टक्के, देयके मंजूर करून धनादेश काढून देणाऱ्याला २ टक्के व इतर अनेक टप्प्यांमध्ये टक्केवारीप्रमाणे पैसे द्यावे लागतात. देयके मंजूर झाल्यानंतर पुरवठादाराला धनादेश देण्यापूर्वी किमान १० टक्के पैसा संबंधित खादाड यंत्रणेच्या खिशात घालावे लागतात. नागपुरातील एका पुरवठादाराची ७२ लाख ९२ हजार २४६ रुपयांची देयके मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. या पुरवठादारासह अनेक पुरवठादारांचीही लाखोंची देयके प्रलंबित असल्याचे कळते. औषधांचा पुरवठा झाल्यानंतर लगेच दोन महिन्यात देयके निकाली लागण्याची आवश्यकता असताना, कमिशन देण्यास नकार दिल्याने बिले प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. यासंदर्भात काही पुरवठादारांनी थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडेच तक्रार केली आहे. तक्रारीत पुरवठादारांनी ‘ट्रेझरीतून धनादेश मिळण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेत बराच कालावधी लागतो. त्यामुळे आमची आर्थिक कोंडी होते. वारंवार प्रलंबित देयकाचे धनादेश काढण्यासाठी पाठलाग करावा लागतो. मात्र, वेळेत रक्कम मिळत नाही’, अशी खंत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)