शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:08 IST

उमरेड : कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळाला नसल्याने पारशिवनी तालुक्यातील कांद्री येथील कोविड सेंटरमध्ये पाच जणांचा तडफडून मृत्यू ...

उमरेड : कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळाला नसल्याने पारशिवनी तालुक्यातील कांद्री येथील कोविड सेंटरमध्ये पाच जणांचा तडफडून मृत्यू झाला. इकडे सुविधांच्या बाबतीत अद्यापही परिपूर्णत: नसलेल्या उमरेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने लगेच सावध होणे गरजेचे आहे. स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथे एका हॉलमध्ये महिला आणि पुरुष रुग्णांसाठी ३८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या याठिकाणी ३० रुग्ण औषधोपचार घेत आहेत. याठिकाणी केवळ तीन ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा असून, एकावेळेस केवळ तीनच रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो. अशावेळी अन्य रुग्णांना ऑक्सिजन तातडीने हवे असल्यास गंभीर परिस्थिती ओढवत असते. त्यातच नवीन रुग्ण आले तर त्यांना ऑक्सिजनअभावी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला जातो. एकीकडे नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये जागाच शिल्लक नाही. दुसरीकडे ग्रामीण भागातील गोरगरीब-सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल, अशी खासगी दवाखान्यात सुविधा उपलब्ध नाही. यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचे बेहाल होत आहेत. दिवसागणिक परिस्थिती हाताबाहेर जात असून, कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यास भयानक परिस्थिती उद‌्भवण्याची संभावना व्यक्त होत आहे.

सिलिंडरचे व्हॉल्व्ह निकामी

ऑक्सिजनबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने माहिती काढली असता, ऑक्सिजन सिलिंडरचे व्हॉल्व्ह निकामी झाल्याची बाब समोर आली. सिलिंडरचे व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे त्याचा वापर करता येत नाही. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर टाकली असून, मागणी केलीे; मात्र अद्याप पुरवठा झालेला नाही, अशी माहिती मिळाली. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावे. तसेच रुग्णांची संख्या आणखी अधिक वाढण्यापूर्वीच योग्य व उत्तम व्यवस्था कशी असावी, याकडे जाणिवेने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय वाघमारे, प्रमोद घरडे, दिलीप राऊत, अश्विन उके, नागसेन निकोसे, रामेश्वर सोनटक्के आदींनी केली आहे.