शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत बांधणार लाखावर शौचालय

By admin | Updated: July 7, 2015 02:33 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याला २०१४-१५ या वर्षात १६,२०८ वैयक्तिक शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते

स्वच्छ भारत मिशन : स्वच्छता मिशन विभागाचा संकल्पगणेश हूड नागपूरस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याला २०१४-१५ या वर्षात १६,२०८ वैयक्तिक शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात १८,६८२ शौचालयांचे बांधकाम करून विभागात चांगली कामगिरी केली. पुढील चार वर्षात १,१५,४२३ शौचालयांचे बांधकाम करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन विभागाने केला आहे. वार्षिक कृती आराखड्यानुसार वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांनी पूर्ण केले. इतकेच नव्हे तर पुढील वर्षाच्या उद्दिष्टांपैकी ३० जूनपर्यंत सहा हजाराहून अधिक शौचालयांची कामे करण्यात आली आहेत. जिल्ह्यात २०१४ सालापासून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. परंतु लाभार्थीला बांधकाम के ल्यानंतर शासनाकडून अनुदान दिले जाते. या योजनेतील लाभार्थी प्रामुख्याने गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना ही रक्कम खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे सुरुवातीला या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. ही बाब विचारात घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी लाभार्थींना बांधकामापूर्वी अनुदानाचा पहिला हप्ता देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यात मिशनने चांगलीच गती घेतली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत १८०२ शौचालयांचे बांधकाम अधिक करण्यात यश आले आहे. जोंधळे यांच्या मार्गदर्शनात पुढील वर्षातही उद्दिष्टाहून अधिक शौचालयांचे बांधकाम होईल असा विश्वास विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.लाखाहून अधिक शौचालय उभारणारकेंद्र सरकारने हाती घेतलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी माहिती, शिक्षण व संवादाच्या उपक्रमाद्वारे जिल्ह्यात प्रचार व प्रसार क रण्यात आला. परंतु लोकांची आर्थिक अडचण विचारात घेता अगाऊ अनुदानाचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. याला चांगला प्रतिसाद मिळाला २०१९ सालापर्यंत जिल्ह्यात १,१५,४२३ शौचालयाचे बांधकाम होण्यात कोणतीही अडचण जाणार नाही.शिवाजी जोंधळेमुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.