शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये कोंडतोय रुग्णाचा ‘श्वास’!

By admin | Updated: November 14, 2015 02:58 IST

रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेन्डंटचीही महत्त्वाची भूमिका असते, परंतु मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ...

सुमेध वाघमारे नागपूररुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेन्डंटचीही महत्त्वाची भूमिका असते, परंतु मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) या दोघांचाही तुटवडा आहे. कधी स्ट्रेचर राहते तर त्याला ओढणारा अटेन्डंट राहत नाही, तर कधी हे दोन्ही शोधून सापडत नाही. अशावेळी रुग्णाला पाठीवर घेऊन तर कधी कडेवर घेऊन धावाधाव करावी लागते. ती बिकट वेळ निभवून नेताना दमछाक होते. अनेकवेळा रुग्णाच्या जीवावरही बेतते. रुग्णाच्या ‘श्वासा’साठी आप्तांची धडपड नेहमीच दिसून येते.मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून मेडिकलची ख्याती आहे. मेडिकलमध्ये ४६ वॉर्ड मिळून १४०१ खाटांची व्यवस्था आहे. रुग्णालयात रोज १५०० ते १६०० रुग्ण दाखल होतात. बाह्य रुग्ण विभागात १६०० ते २ हजार रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात. परंतु येथे पदोपदी आवश्यक सेवेचा अभाव असल्याचे दिसून येते. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला किंवा कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणले की त्याला स्ट्रेचरने अपघात विभागात किंवा बाह्यरुग्ण विभागात नेले जाते. त्यानंतर संबंधित वॉर्डात उपचारासाठी नेण्यात येते. सध्या मेडिकलच्या अपघात विभागात रुग्णांची ने-आण करण्यासाठी पाच ते सहा स्ट्रेचर व दोन ते तीन व्हील चेअर्स आहेत. एकूण ४६ वॉर्डात प्रति वॉर्ड एक किंवा दोन असे जवळपास ६५ ते ७० स्ट्रेचर असल्याचे मेडिकल प्रशासनाकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागात किंवा विविध वॉर्डामध्ये स्ट्रेचर उपलब्ध नसल्याची तक्रार अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची आहे. संबंधित वॉर्डाच्या डॉक्टरांना आणि परिचारिकेला विचारणा केली असता ते सुद्धा दुर्लक्ष करीत असतात. रुग्णांच्या नातेवाईकांनाच तुम्ही पहा, अशी उत्तरे मिळतात.त्यामुळे स्ट्रेचर किंवा व्हील चेअर्स शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना शोध घ्यावा लागतो.कधी मिळेल सुविधा ?मेडिकलमध्ये कोंडतोय रुग्णाचा ‘श्वास’!नागपूर : रुग्णालयात स्ट्रेचर आणि तो ओढणारा अटेन्डंट दोन्ही एकाच वेळी मिळणे हे रुग्णाच्या नशीबाचा भाग मानला जाते, परंतु बहुसंख्य रुग्णांच्या नशिबी ही बाब येत नाही. एक तर त्याला अटेन्डंट मिळतो किंवा स्ट्रेचर. अनेकवेळा हे दोन्ही मिळत नाही. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर किंवा व्हील चेअर्ससाठी ताटकळत उभे राहावे लागते. धक्कादायक म्हणजे, आॅक्सिजन लावलेल्या रुग्णालाही स्ट्रेचर व अटेंडंट मिळत नाही. अशावेळी लहान मुलगा असेल तर त्याला कडेवर घेऊन तर मोठा इसम असेल तर त्याला आधार देत किंवा पाठीवर बसवित दुसरा नातेवाईक आॅक्सिजनचे सिलिंडर ओढताना दिसून येतो. यात सिलिंडर संपले, आॅक्सिजनचा मास्क घसरल्यास थेट रुग्णाच्या जीवावर बेतते. (प्रतिनिधी)