शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

राजा गंथाड्याचा खून

By admin | Updated: November 17, 2016 02:57 IST

जुन्या वैमनस्यातून बुधवारी सकाळी गंगा-जमुना या वस्तीत एका कुख्यात गुन्हेगाराचा गळा कापून खून करण्यात आला.

गंगा-जमुनातील घटना : तीन आरोपी अटकेत नागपूर : जुन्या वैमनस्यातून बुधवारी सकाळी गंगा-जमुना या वस्तीत एका कुख्यात गुन्हेगाराचा गळा कापून खून करण्यात आला. राजा गंथड्या ऊर्फ राजेश सुरेश बेलेकर असे मृताचे नाव आहे. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपीला अटक केली आहे. रोशन चौरसिया (२६) रा. पारडी, सोनू साखरे (२६) रा. खदान ज्योतीनगर आणि संतोष उर्फ बालू गोसावी (२८) रा. अखाडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी सात हजार रुपयावरून राजन गंथाड्या आणि रोशन यांच्यात वाद झाला होता. या वादावरूनच गंथाड्याचा खून झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. राजा गंथाड्या हा कुख्यात गुन्हेगार आहे. तो गंगा जमुना वस्तीत सायकल स्टँड चालवित होता. त्याच्याविरुद्ध खुनाचे तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपी रोशन भाड्याने आॅटो चालवितो. सोनू साखरे रोशनचा जवळचा मित्र आहे. बालू श्रीवास हा काही दिवसांपासून राजा गंथाड्याच्या सायकल स्टँडवरच काम करीत होता. मृत राजाला रोशनने काही रुपये उधार दिले होते. ते रुपये तो परत मागत होता. परंतु रुपये परत करण्याऐवजी आपल्यासोबत मिळून काम करण्यासाठी राजा रोशनला धमकावत होता. रोशनने त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला असता तो त्याला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. या धमकीमुळे रोशन घाबरू लागला. रोशनने याबाबत त्याचा पानठेला चालक मित्र सोनू साखरेला सांगितले. सोनूचा गंगा जमुना वस्तीत पानठेला आहे. तो सुद्धा राजा गंथाड्यापासून त्रस्त होता. त्यामुळे त्या दोघांनी त्यालाच संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी राजा गंथाड्याचा विश्वासू व्यक्तीची गरज होती. त्या दोघांनी संतोषलाही आपल्यासोबत मिळवून घेतले. दोन दिवसापूर्वीच राजाने संतोषला मारहाण केली होती. ठरलेल्या योजनेनुसार तिन्ही आरोपी बुधवारी सकाळी ४ वाजेपासून राजा गंथाड्याची वाट पाहत होते. संतोष सायकल स्टँडवर होता तर रोशन व सोनू थोड्या अंतरावर होते. सकाळी ६.१५ वाजता राज गंथाड्या सायकल स्टँडवर आला. येताच तो प्लास्टीकच्या खुर्चीवर बसला. काही वेळाने रोशन व सोनू मोटारसायकलने आले. येताच ते दोघेही राजा गंथाड्यावर धावून गेले. शस्त्रासह त्याच्यावर हल्ला केला. हल्ला होताच राजा पळून जाऊ लागला. परंतु रोशन व सोनूने पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा कापून त्याचा खून केला. रोशन व सोनूने खुनाची कबुली दिली आहे. राजा गंथाड्याचा गंगा जमुना परिसरात दबदबा वाढला होता. तो या वस्तीत बाहेरून येणाऱ्या लोकांना लुटत होता. विरोध करणाऱ्यांना मारायचा. सकाळी खुनाची माहिती सूचना मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा घटनास्थळी पोहोचले. लकडगंज पोलिसांनी तीन आरोपीला अटक केली आहे. सैनिकाच्या खुनात होता सहभागी सूत्रानुसार गंगा-जमुना वस्तीत एका सैन्यातील जवानाचा खून करण्यात आला होता. त्यात मृत राजा गंथाड्या आणि त्याचे पाच साथीदार सहभागी असल्याचे सांगिले जाते. राजाने बालाजी मंदिराजवळ एक आलिशान घर बांधले आहे.