शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

उपराजधानीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:38 AM

शासकीय रुग्णालयांमध्ये ५० मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राज्यात पहिले रुग्णालय ठरले आहे. मात्र यंत्र सामुग्री, सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यास हेच प्रशासन उदासीनता दाखवित आहे.

ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यंत्र बंद, साहित्याचा अभाव, सर्जिकल स्टोअर्सची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय रुग्णालयांमध्ये ५० मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राज्यात पहिले रुग्णालय ठरले आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रुग्णालय प्रशासनही आपली पाठ थोपटून घेत आहे, मात्र या शस्त्रक्रियेसाठी लागणारी यंत्र सामुग्री, सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यास हेच प्रशासन उदासीनता दाखवित आहे. परिणामी, १९ जून रोजी होणारे मूत्रपिंड प्रत्यारोपण पुढे ढकलावे लागले आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याचा मान नागपूर मेडिकलला मिळाला आहे. ९ फेब्रुवारी २०१६ पासून हाती घेण्यात आलेल्या या केंद्रामुळे ५० रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या संदर्भात पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. सोबतच प्रत्यारोपणामध्ये सहभागी असलेल्या नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, युरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. धनंजय सेलुकर, मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. समीर चौबे, बधिरीकरण तज्ज्ञ विजय श्रोते व डॉ. मेहराज शेख यांच्या कार्याचे कौतुकही केले. महिन्यातून दोन वेळा होणारे मूत्रपिंड प्रत्यारोपण आता महिन्यातून तीन वेळा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. परंतु या स्तुत्य कार्यात त्यांचेच अधिकारी त्यांना मदत करीत नसल्याचे चित्र आहे. यामुळे जून महिन्यात केवळच एकच प्रत्यारोपण होऊ शकले आहे.वडील देणार होते मुलाला मूत्रपिंडतरुण वयात मुलाचे मूत्रपिंड निकामी झाल्याने वडिलांनी पुढाकार घेत मुलाला मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. सर्व चाचण्या व कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर १९ जून रोजी प्रत्यारोपण करण्याची तारीख रुग्णालयाने दिली. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी वडील आणि मुलगा भरतीही झाले. रुग्ण व दात्याकडून शस्त्रक्रियेची तयारीही पूर्ण करून घेण्यात आली. परंतु ऐनवेळी यंत्र बंद असल्याचे व सर्जिकल साहित्य नसल्याचे कारण देऊन शस्त्रक्रिया थांबवली. सूत्रानुसार, रुग्णांच्या नातेवाईकांनी बंद यंत्राचा दुरुस्तीसाठी पैसे खर्च करण्यासही पुढाकार घेतला. परंतु प्रशासन जागे झालेले नव्हते.मार्च महिन्यापासून यंत्र दुरुस्तीचा प्रस्तावशस्त्रक्रिया करताना रुग्णाला विद्युत उपकरणाचा झटका लागू नये म्हणून ‘कॉटरी’ या यंत्राची मदत घ्यावी लागते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असे तीन यंत्र आहेत. यातील एक यंत्र बंद पडले आहे. सूत्रानुसार, नेफ्रोलॉजी विभागाने यंत्र दुरुस्तीचा व नवे सर्जिकल साहित्य घेण्याचा प्रस्ताव सर्जिकल स्टोअर्सला मार्च महिन्यात दिला होता. परंतु दोन महिन्यांचा कालावधी होऊनही यंत्र दुरुस्तही झाले नाही आणि साहित्यही मिळाले नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेचा फटका मूत्रपिंड निकामी झालेल्या गंभीर रुग्णाला बसला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय