शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणदक्ष राहा, गोपनीयता बाळगा

By admin | Updated: May 13, 2014 00:54 IST

कर्मचार्‍यांनी मतमोजणीच्या कामात दक्ष असावे आणि गोपनीयता बाळगावी, अशा सूचना मतमोजणी कर्मचार्‍यांना देण्यात आल्या.

मतमोजणी : कर्मचार्‍यांना नागपूर : कर्मचार्‍यांनी मतमोजणीच्या कामात दक्ष असावे आणि गोपनीयता बाळगावी, अशा सूचना मतमोजणी कर्मचार्‍यांना देण्यात आल्या.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी कळमना मार्केटमध्ये होणार आहे. यासाठी कर्मचार्‍यांना सोमवारी येथील देशपांडे सभागृहात पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्णा, अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे, उपविभागीय अधिकारी राहुल रेखावार, अविनाश कातडे, उमेश काळे, उपजिल्हाधिकारी संगीतराव, राम जोशी, आशा पठाण यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते.

मतमोजणीचे काम जोखमीचे व राजकीय पक्षांसाठी संवेदनशील असल्याने कर्मचार्‍यांनी काम करताना दक्ष राहणे आवश्यक आहे.

याशिवाय निवडणूक कामातील गोपनीयतेचाही भंग होऊ नये याचीही काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी कर्मचार्‍यांना देण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी आशा पठाण यांनी सादरीकरणाद्वारे मतमोजणीच्या प्रक्रियेची माहिती दिली.

मतमोजणीच्या वेळी निवडणूक निरीक्षक, निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखीखाली मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक, सहायक आणि इतर कर्मचारी काम करणार आहेत. मतमोजणीस्थळी कर्मचार्‍यांनी मोबाईल फोन्स किंवा लॅपटॉप आणू नये,

अशा सूचना कर्मचार्‍यांना देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा १५ मे रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)