शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार आणि फरार गुंडांची हत्या, नागपूरमधील खरबी चौकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:31 IST

सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यानच नागपूरात एका तडीपार आणि फरार गुंडांची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नामुष्की ओढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

नागपूर : सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यानच नागपूरात एका तडीपार आणि फरार गुंडांची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास घडली. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नामुष्की ओढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरातील खरबी चौकाजवळील लक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटजवळ दोन कुख्यात गुंडांची हत्या करण्यात आली.भुऱ्या उर्फ संजय कदोई बनोदे (वय ४०, रा. पांढराबोडी), बादल संजय शंभरकर (वय २६, रा. कुंजीपेठ) अशी मृतांची नावे आहेत. तर, राजेश हनुमंत यादव (वय ४५, रा. बाजारगाव) असे गंभीर जखमी असलेल्याचे नाव आहे.संजय बनोदे हा खतरनाक गुंड होता. दोन वर्षांपुर्वीपर्यंत तो पांढराबोडीतील खतरनाक गुंड भुऱ्या उर्फ सेवक मसरामचा साथीदार म्हणून ओळखला जायचा. अलिकडे या दोघांमधून विस्तव जात नव्हता. दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले होते. या पार्श्वभूमीवर, संजय त्याचा गुंड साथीदार बादल शंभरकर आणि राजेश यादव यांच्यासोबत स्प्लेंडरवर बसून खरबी चौकातून मंगळवारी पहाटे पारडीकडे जात होता. त्याच्या मागावर असलेले गुंड स्वीफ्ट कार (एमएच ४०/ एआर ५७२२)मधून त्यांचा पाठलाग करीत होते. खरबी चौकातून १०० मिटर अंतरावर लक्ष्मी भोजनालयाजवळ आरोपींनी भुऱ्याच्या स्प्लेंडरला जोरदार धडक मारली. त्यामुळे ते भुऱ्या, बादल आणि राजेश तिघेही खाली पडले. त्यांना फारसा मार लागला नसल्याने ते उठून उभे झाले. ते पाहून कारमधून चार गुंड उतरले. त्यातील दोघांनी लोखंडी रॉडने भुऱ्या आणि त्याच्या साथीदारांवर जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर फटके पडल्याने तिघेही रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले. त्यानंतर आरोपी दुसऱ्या वाहनाने पळून गेले.दरम्यान, बादल शंभरकर आणि संजय बानोदे यांची हत्या गॅंगवॉमधून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरMurderखून