शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

न्या. पुष्पा गणेडीवाला यांना न्यायमूर्ती पदावर कायम करण्याची शिफारस मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोक्सो कायद्यांतर्गत बालिकांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील दोन वादग्रस्त निर्णयांनतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोक्सो कायद्यांतर्गत बालिकांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भातील दोन वादग्रस्त निर्णयांनतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांची पदावर कायम करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मागे घेतली आहे. न्यायपालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

न्या. गणेडीवाला यांची १३ फेब्रुवारी २०१९ रोजी उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. सेवेची दोन वर्षे संपत आल्यामुळे त्यांना कायम करणारा निर्णय अपेक्षित होता. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गेल्या २० जानेवारीला त्यांना न्यायमूर्ती पदावर कायम करण्याची शिफारस केली होती. मात्र, वादग्रस्त निकालांमुळे दहाच दिवसांत ही शिफारस मागे घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय कॉलेजियमध्ये सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे तसेच न्या. एन. व्ही. रामण्णा व न्या. आर. एफ. नरीमन यांचा समावेश आहे.

प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स (पॉक्सो) अ‍ॅक्ट प्रकरणातील दोन निर्णय न्या. गणेडीवाला यांना भोवले आहेत. एका प्रकरणात १२ वर्षीय मुलीच्या छातीला स्पर्श करणाऱ्या आरोपीची पॉक्सोमधील शिक्षा विनयभंगाच्या कलमाखाली बदलताना, प्रत्यक्ष त्वचेला स्पर्श होत नसेल व अल्पवयीन मुलीला केवळ कपड्यावरून स्पर्श होत असेल तर तो लैंगिक अत्याचार होत नाही, असा निकाल दिला. महाधिवक्ता के. के. वेणूगोपाल यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालाला स्थगिती दिली. दुसऱ्या एका निकालात न्या. गणेडीवाला यांनी, मुलीचा हात धरणे व पँटची झिप उघडणे म्हणजे लैंगिक अत्याचार होत नाही, असे मत नोंदवून आरोपीने भोगलेली शिक्षा पुरेसी असल्याचा निवाडा दिला.

कोण आहेत न्या. पुष्पा गणेडीवाला?

न्या. पुष्पा विरेंद्र गणेडीवाला यांचा जन्म ११ मार्च १९६९ रोजी अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे झाला. संपूर्ण शैक्षणिक प्रवासात अत्यंत हुशार अशी त्यांची ओळख होती. बी.कॉम., एलएल.बी. व एलएल.एम. परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. पहिल्याच प्रयत्नात नेट-सेट परीक्षासुद्धा उत्तीर्ण केली. त्यानंतर अमरावती जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली. विविध बँका व विमा कंपन्यांसाठी वकिलांच्या पॅनलच्या त्या सदस्य होत्या. अमरावतीच्या विद्यापीठातील विविध एमबीए व एलएलएम महाविद्यालयात त्यांनी अध्यापनही केले. २००७ मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून थेट नियुक्ती झाली. मुंबईत शहर दिवाणी न्यायाधीश, तसेच नागपूर जिल्हा न्यायालय, कुटुंब न्यायालयात त्यांनी काम केले. याशिवाय महाराष्ट न्यायाधिकरण अकादमीच्या सहसंचालक, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर १३ फेब्रुवारी २०१९ ला मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली.