शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

न्याय मिळाला पण २२ वर्षांपासून अंमलबजावणीची प्रतिक्षा; नागपूर महानगरपालिकेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:15 AM

गेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली.

ठळक मुद्देमनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हन्यायालयाच्या निर्णयानंतरही अतिक्रमण कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या गांधीबाग झोनमधील नवाबपुरा येथील निवासी मन्सूर शरीफ शेख इब्राहीम १९९५साली काही महिन्यासाठी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान त्यांच्या मालकीच्या ४५० चौरस फूट जागेवर शेजाऱ्याने अतिक्रमण केले. त्यावेळी मन्सूर इब्राहीम ४४ वर्षांचे होते. आज त्यांचे वय ६६ वर्षे झाले तरीही महापालिक ा मुख्यालय व गांधीबाग झोनमध्ये चकरा मारत आहे. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.मुख्यमंत्री, नगर विकास विभागाला निवेदने दिली. परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही. आजही अतिक्रमण कायम आहे. न्याय मिळेल अशा आशेने गुरुवारी त्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊ न अतिक्रमण हटविण्याची मागणी केली.लोकमतशी चर्चा करताना मन्सूर इब्राहीम म्हणाले, अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका आयुक्त, झोनचे सहायक आयुक्त, महापौर यांना वेळोवेळी निवेदने दिली. पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली. परंतु शेजारी घनश्याम नाकाडे यांनी केलेले अतिक्रमण हटविले नाही.२७ नोव्हेंबर १९९५ रोजी महापालिकेच्या प्रवर्तन विभागाचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी आले होते. परंतु पथक कारवाई न करताच परतले. त्यानंतर पुन्हा तक्रार केली. ३ जानेवारी १९९६ रोजी दुसऱ्यांदा पथक आले. परंतु अतिक्रमण हटविले नाही. प्रवर्तन विभागाने २००४ मध्ये शिडी तोडण्याचे आदेश काढले.पण ही फाईल वेगवेगळ्या विभागात २०१० पर्यत फिरत होती. १९जानेवारी २०११ रोजी पुन्हा पथक आले. पण कारवाई न करताच पथक परतले. कारवाई करण्यासाठी अनेकदा पथक आले. परंतु अतिकमण न हटविता पथक प्रत्येकवेळी माघारी परतल्याची माहिती इब्राहीम यांनी दिली.

न्यायालयाच्या निर्देशानंतरही कारवाई नाहीमहापालिकेकडून न्याय मिळत नसल्याने इब्राहीम यांनी न्यायालयात धाव घेतली. ३० जुलै २०१५ रोजी न्यायालयाने महापालिका प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. परंतु अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.

भटकंती करून थकलोगेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका