शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या जिनिंगला आग

By admin | Updated: May 20, 2014 01:06 IST

स्थानिक गोपीचंद कॉटन इंडस्ट्रीजच्या जिनिंगला सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारस आग लागली. यात अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले.

जलालखेडा : स्थानिक गोपीचंद कॉटन इंडस्ट्रीजच्या जिनिंगला सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारस आग लागली. यात अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही आग जिनिंगमधील रेच्याजवळ झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने यात प्राणहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. जलालखेडा-नरखेड मार्गावर जलालखेड्यापासून ४०० मीटर अंतरावर राजकुमार दयालचंद सतिजा रा. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा (मध्य प्रदेश) यांच्या मालकीची गोपीचंद कॉटन इंडस्ट्रीज आहे. सोमवारी सकाळी या जिनिंगमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू असताना रेच्याजवळ शॉर्ट सर्किट झाले आणि ठिणगी उडाली. त्यामुळे रेच्याजवळ असलेल्या कापूस व रुईने पेट घेतला. पाहता-पाहता ही आग इतरत्र पसरली. या रेच्याजवळ सहा कामगार काम करीत होते. यावेळी राजकुमार सतिजा हे जिनिंगच्या कार्यालयात बसून होते. लगेच जलालखेडा पोलीस तसेच मोवाड, काटोल व वरूड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली. दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास काटोल व त्यानंतर पाच मिनिटांनी वरुड नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. दुपारी २.३० वाजेपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशनम दलाला यश आले होते. सुरुवातीला जिनिंगच्या शेजारी असलेल्या कैलस मेहतकर यांच्या शेतातील विहिरीवरील मोटरपंप सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेच्यावेळी या जिनिंगमध्ये अंदाजे २० कामगार काम करीत होते. शिवाय, व्यापार्‍यांचे कापसाचे पाच मेटॅडोरही या जिनिंगच्या आवारात उभे होते. आग लागल्याचे कळताच जिनिंगमधील सर्व कर्मचारी व कामगार लगेच बाहेर पडले. शिवाय, कापसाचे मेटॅडोरही बाहेर काढण्यात आले. या आगीत अंदाजे एक कोटी १० लाख रुपये किमतीचा २२०० क्विंटल कापूस व रुईच्या गठाण, ६० लाख रुपये किमतीच्या मशीन व ३० लाख रुपयांचे इतर साहित्य खाक झाले असून, अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती राजकुमार सतिजा यांनी दिली. माहिती मिळाताच जलालखेड्याचे ठाणेदार (प्रभारी) जीवन भातकुले, तहसीलदार तुकाराम झिरवाड, नायब तहसीलदार धर्मेंद्र फुसाटे यांच्यासह नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. मंडळ अधिकारी जंगले व तलाठी वानखेडे यांनी पंचनामा केला. (वार्ताहर)