शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ अभियंता बोरकरला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: January 3, 2016 03:39 IST

नगर परिषद दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या बांधकामात गैरव्यवहारप्रकरणी कनिष्ठ अभियंता सुरेश बोरकर यांना कामठी पोलिसांनी अटक केली.

कामठी : नगर परिषद दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या बांधकामात गैरव्यवहारप्रकरणी कनिष्ठ अभियंता सुरेश बोरकर यांना कामठी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीस कामठी न्यायालयातील सत्र न्यायाधीश पी. एस. इंगळे यांच्या न्यायालयात हजर करून आरोपीची ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली.स्थानिक नगर परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रभाग ७ मधील सिमेंट रोड बांधकामात कनिष्ठ अभियंता सुरेश बोरकर यांनी कंत्राटदाराशी संगनमत करून बनावट बिले सादर केली. सदर बांधकामाचे दुसऱ्यांदा बिल सादर करून सहा लाखांची उचल करून गैरप्रकार केल्याची तक्रार मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांनी ३ डिसेंबर रोजी नवीन कामठी पोलीस ठाण्यात केली होती.या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी कनिष्ठ अभियंता बोरकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७, १६६ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हा दाखल होताच आरोपीने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र व उच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बोरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न चालविले होते.दरम्यान, शुक्रवारी (दि.१) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तहसील कार्यालय परिसरात बोरकर यांना अटक केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीस शनिवारी कामठी सत्र न्यायालयात न्यायाधीश पी.एस. इंगळे यांच्या न्यायालयात हजर करून आरोपीची ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली.या बांधकाम गैरप्रकरणी महिला कंत्राटदारास चार दिवसांपूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली होती. सदर महिला कंत्राटदाराची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. या बांधकाम गैरप्रकारात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अजूनही काही मोठे मासे अडकणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात चर्चिली जात आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक पोलीस निरीक्षक अमरसिंग जायवार करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)