शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

जंगल सफारी पावसाळ्यातही सुरूच राहणार!

By admin | Updated: June 29, 2014 01:12 IST

पर्यटकांसाठी आनंद पर्वणी ठरलेले उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य इतर अभयारण्याप्रमाणे पावसाच्या दिवसात बंद ठेवण्यात यायचे. त्यामुळे या दिवसांत पर्यटकांना जंगलसफारी करता येत नव्हती. मात्र,

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य : २४ कि.मी.चे रस्ते पर्यटकांसाठी खुलेशरद मिरे - भिवापूरपर्यटकांसाठी आनंद पर्वणी ठरलेले उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य इतर अभयारण्याप्रमाणे पावसाच्या दिवसात बंद ठेवण्यात यायचे. त्यामुळे या दिवसांत पर्यटकांना जंगलसफारी करता येत नव्हती. मात्र, प्रथमच पावसाळ्यातही पर्यटकांसाठी हे अभयारण्य अशंत: सुरू ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यामुळे पावसाळ्यात विविध वृक्षांनी हिरव्यागार नटलेल्या घनदाट उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना जंगल सफारी करता येईल. वाघ, बिबट यासह वन्यप्राण्यांची लक्षणीय संख्या व भुरळ पाडणारा वन्यप्राण्यांचा मुक्त संचार यामुळे अल्पावधीतचं उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांच्या पसंतीस उतरले. परिणामी, वर्षभरात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाळ्यात या अभयारण्यात जंगलसफारी करता यावी, यासाठी पर्यटकांची धडपड सुरू असते. या दिवसांत अभयारण्यातील अंतर्गत रस्ते खराब होत असल्याने सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाची तारांबळ उडते. शिवाय, येथील जैवविविधतेला धोका निर्माण होतो. पावसामुळे रस्ते खराब होऊन पर्यटकांची वाहने अडकण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्वच अभयारण्य व व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात अंशत: बंद ठेवण्यात येतात. राज्यात सर्वप्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात सुरू ठेवण्यात येऊ लागला. त्यांनतर गेल्या दोन वर्षापासून पेंच व्याघ्र प्रकल्प व आता उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यही पावसाळ्यात सुरू ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला असून, पर्यटकांना जंगलसफारी दरम्यान एक वेगळा आनंद अनुभवता येईल. या अभयारण्यात पर्यटकांना जंगल सफारीसाठी कऱ्हांडला ते रानबोडी (तिप्पट) हा ६ कि.मी.चा रस्ता, रानबोडी (तिप्पट) ते नवेगाव (देशमुख) हा १० कि.मी.चा रस्ता, भालेराव (तिप्पट) ते पुल्लर प्रवेशद्वार हा ८ कि.मी.चा रस्ता, असे एकूण २४ कि.मी.चे रस्ते पर्यटकांना जंगल सफारीसाठी खुले राहणार आहे.