शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांचे दागिनेही चोरले जाताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना रुग्णांना आधीच मोठ्या समस्यांना सामारे जावे लागत आहे. एकीकडे बेड उपलब्ध नाहीत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना रुग्णांना आधीच मोठ्या समस्यांना सामारे जावे लागत आहे. एकीकडे बेड उपलब्ध नाहीत. बेड उपलब्ध झालेच तर ऑक्सिजन नाही. रेमेडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे. आता कोरोना रुग्णांचे दागिनेही रुग्णालयातून चोरीला जाऊ लागले आहेत. सेंट्रल एव्हेन्यू आंबेडकर चौक येथील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित कुटुंबाने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली आहे.

सोमवारी क्वॉर्टर येथील रहिवासी असलेल्या एका फळ व्यापाऱ्याच्या पत्नीला कोरोना संसर्ग झाल्याने तिला आंबेडकर चौक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू हाेते. १६ एप्रिल रोजी दुपारी मुलगा आईसाठी लागणारे इंजेक्शन द्यायला आयसीयूमध्ये गेला. तिथे त्याला आईच्या अंगावरील दागिने दिसून आले नाहीत. त्याने रुग्णालयातील डॉक्टरांना यासंदर्भात विचारणा केली. तेव्हा डॉक्टरांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यावेळी जास्त विचारपूस करणे मुलाला योग्य वाटले नाही. १७ एप्रिल रोजी पहाटे संबंधित व्यापाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र पीडित कुटुंबाने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याचप्रकारची घटना दोन दिवसांपूर्वी मेयो रुग्णालयात घडली होती. कोरोना संसर्गित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर मृतदेह कुटुंबाला सोपवला जात नाही. मनपा कर्मचारी मृतदेह थेट स्मशानभूमीवर घेऊन जातात. तिथे मनपा कर्मचारीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. मृताचे कुटुंबीय आपल्या दु:खात असतात. भीतीमुळे परिवारातील एखाद दुसरा सदस्यच घाटावर येतो. त्यावेळी रुग्णाच्या शरीरावर दागिने असल्याचे कुणाच्या लक्षातही राहत नाही. खरा प्रकार लक्षात आलाच तर पोलीस किंवा डॉक्टरांकडे तक्रार करण्याची हिंमतही कुणी करीत नाही. दोन-चार दिवस उलटल्यावर सर्वकाही सामान्य होते. फळ व्यापाऱ्यालासुद्धा पत्नीच्या मृत्यूनंतर याच अवस्थेतून जावे लागले. परंतु संबंधित डॉक्टरांकडून उपचारात निष्काळजी केली जात असल्याची बाब काही लोकांनी सांगितली तेव्हा त्यांनी लगेच तक्रार दाखल केली. लकडगंजचे पीआय पराग पोटे यांनी तक्रारीची पुष्टी करीत तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.