शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैयाकडून दीक्षाभूमीवर जय भीमचा घोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 03:05 IST

कन्हैया कुमार याने गुरुवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्याने मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करीत बुद्धवंदना केली.

नागपूर : कन्हैया कुमार याने गुरुवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्याने मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करीत बुद्धवंदना केली. यावेळी कन्हैयाकुमार याला भेटण्यासाठी व पाहण्यासाठी तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. कन्हैयाकुमार सकाळी ११ वाजता दीक्षाभूमीवर पोहचला. त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि सलील देशमुख होते. अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कन्हैया दीक्षाभूमीवर दाखल झाला. तो थेट दीक्षाभूमीवरील मध्यवर्ती स्मारकात गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन त्याने बुद्धवंदना म्हटली. यानंतर बाहेर येऊन कन्हैया कुमार याने जय भीमच्या घोषणा देत, बाबा तेरा मिशन अधुरा, हम सब मिलकर करेंगे पुरा... संघवादसे आझादी... अशा घोषणा दिल्या. यावेळी त्याला पाहण्यासाठी लोकांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये मोठा उत्साह होता. मध्यवर्ती स्मारकापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत पोहचण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. मोबाईलवर त्याचे छायाचित्र काढण्यासाठी स्पर्धा लागली होती.(प्रतिनिधी)