काकाच्या मित्रानेच लॉजवर गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार

By दयानंद पाईकराव | Updated: September 29, 2023 14:26 IST2023-09-29T14:22:41+5:302023-09-29T14:26:50+5:30

आरोपीस अटक : पिडीतेच्या बहिणीला औषध देण्यासाठी आला होता नागपुरात

It was the uncle's friend who raped Lodge by giving him gungi medicine | काकाच्या मित्रानेच लॉजवर गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार

काकाच्या मित्रानेच लॉजवर गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार

नागपूर : पुतणीला औषध देण्यासाठी काकाने आपल्या मित्राला नागपुरात पाठविले. परंतु त्या नराधमाची मित्राच्या १६ वर्षाच्या पुतणीवर वाईट नजर गेली. त्याने लॉजवर नेऊन गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ ऑगस्टला मध्यरात्री दोन ते सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

चेतन दिनेश साकेवार (वय २४, रा. इंदिरानगर, देवळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते. तिच्या बहिणीची प्रकृती ठिक नसल्यामुळे तिच्या वर्धा येथे राहणाऱ्या काकाने आपल्या मित्राला तिला औषध देण्यासाठी नागपुरात पाठविले. आरोपी चेतनसोबत त्याची एक मैत्रीण होती. ती मैत्रीण आणि पिडीत १६ वर्षाची अल्पवयीन नात्यात असल्यामुळे त्या एकमेकींना ओळखत होत्या. घरी आल्यानंतर आरोपी चेतनने पिडीत मुलीला कोराडी येथे दर्शनासाठी घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगितले. त्यानंतर आरोपी आपली मैत्रीण आणि पिडीतेला घेऊन गेला.

कोराडी मंदिर बंद झाल्याचे सांगून त्याने दोघींना फिरविले. त्यानंतर घरी झोपण्यास जागा होणार नसल्याचे सांगून तो दोघींना वाठोडाच्या एका लॉजमध्ये घेऊन गेला. तेथे पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून त्याने पिडीत १६ वर्षीय मुलीसोबत जबरी संभोग केला. सकाळी उठल्यानंतर पोटात दुखत असल्यामुळे पिडीत मुलगी रडु लागली. त्यावेळी आरोपीने कोणाला काही सांगितल्यास तिच्या घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी वर्धा येथे निघून गेला. भितीपोटी पडित मुलीने ही बाब कोणालाच सांगितली नाही. काही दिवसांनी पिडीत मुलीने आपल्या नात्यातील एका बहिणीला ही बाब सांगितली. त्यानंतर त्यांनी शांतीनगर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) (जे) ३२८, ५०६, सहकलम ४, ८, १२ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस वर्धा येथून अटक केली आहे.

Web Title: It was the uncle's friend who raped Lodge by giving him gungi medicine