पहिल्याच नजरेत प्रेम झालं अन् फक्त बोलण्यासाठी बसला साडेतीन लाखांचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:55 IST2026-02-13T15:54:44+5:302026-02-13T15:55:25+5:30
'लव्ह ॲट फर्स्ट साईट'चा असाही गैरफायदा : 'इन्ट्रो' करून देण्याच्या नावाखाली 'आशिक'कडून उकळले पैसे

It was love at first sight and a shock of three and a half lakhs was paid just for talking.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेम कधी, कुठे आणि कसं जडेल सांगता येत नाही... पण त्या प्रेमाचा गैरफायदा घेतला गेला तर आयुष्यभराची कमाईदेखील हातची जाऊ शकते, हे पुन्हा एकदा नागपुरात सिद्ध झाले आहे. चित्रपटात जसं पहिल्याच नजरेत प्रेम होतं... हिरो स्वप्न रंगवतो... नायिकेशी बोलण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो. तसंच काहीसं नागपूरच्या एका २५ वर्षीय तरुणाच्या आयुष्यात घडलं. फरक इतकाच की, इथे शेवट हॅपी याच्या कडून एंडिंगचा नव्हता तर तब्बल साडेतीन लाख रुपयांच्या फसवणुकीचा ! तिच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणाने तिच्याशी ओळखी करून देण्याच्या नावाखाली त्याच्याकडून ते पैसे उकळले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये हा प्रकार समोर आला असून पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित २५ वर्षीय तक्रारदार हा हाऊस किपिंगचे काम करतो. तो अगोदर शंकरनगरातील एका मोबाईल शोरूममध्ये काम करायचा. शोरूमजवळच एक इस्पितळ होते व तेथे काम करणारी तरुणी त्याला आवडायची. त्याने तिच्याच कार्यालयात काम करणाऱ्या सूरज गुलाब मडावी (गोपालनगर) याला मनातील गोष्ट सांगितले. जर मुलीशी ओळखी करून दिली तर दर महिन्याला हजार रुपये द्यावे लागतील असे सूरजने सांगितले. अगोदर तरुणाने नकार दिला. मात्र जर तिला पैसे दिले तरच ती तुझ्याशी बोलेल असे सूरजने म्हटल्यावर तरुणाने त्याला ते पैसे दिले.
मी तुमची मैत्री करून देतो असे सूरजने म्हटले व परत पैसे घेतले. मात्र तिने तुला मोबाइल क्रमांक देण्यास मनाई केली आहे असे त्याने तरुणाला सांगितले. तिला समजवावे लागेल, खर्च करावा लागेल असे म्हणत सूरजने तरुणाच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला व मार्च २०२४ ते मे २०२५ या कालावधी तरुणाकडून साडेतीन लाख रुपये उकळले. मात्र त्याने एकदाही तिच्याशी तरुणाचे बोलणे करून दिले नाही. तरुणाला तो आणखी पैसे मागत होता. मात्र तरुणी बोलतच नसल्याने माझे पैसे परत कर असे तरुणाने म्हटल्यावर तुझ्या प्रेमाबाबत कार्यालयात सांगून तुझी बदनामी करेन अशी धमकी सूरजने दिली.
यानंतर स्वप्नांच्या दुनियेत रमलेला तरुण अखेर वास्तवात आला अखेर पोलिस ठाण्यात हिंमत करून तरुणाने पाचपावली पोलिसांनी सूरजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार केली.