शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

होत्याचे नव्हते झाले! २० वर्षात नागपूरचे १० तलाव गिळले अतिक्रमणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 09:00 IST

Nagpur News गेल्या २० वर्षात नागपुरातील १०-१२ तलाव अतिक्रमणाने अक्षरश: गिळंकृत केले आहेत.

ठळक मुद्देनैसर्गिक संपत्तीची सर्रास लूट प्रशासन, सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : नैसर्गिक संपत्तीच्या संवर्धनाबाबत आपण इतके बेजबाबदारपणे वागताे की हळूहळू एक एक वारसा गमावला आहे. बिल्डर लाॅबी व अतिक्रमणकारांनी जंगले, नद्या, तलाव घशात घातल्या आहेत आणि सरकार, सत्ताधारी, जबाबदार प्रशासन मूकपणे त्याला प्राेत्साहन देत अतिक्रमणाची मलाई खाण्यात मस्त आहेत. सामान्य माणसांना तर काही देणेघेणेच राहिले नाही. गेल्या २० वर्षात नागपुरातील १०-१२ तलाव अतिक्रमणाने अक्षरश: गिळंकृत केले आहेत. विश्वास बसत नाही ना, पुरावा हवा आहे ना, तर मग ‘गुगल मॅप’वर जा. २००० साली नागपूरच्या स्थितीचे बारकाईने अवलाेकन करा. नंतर कॅलेंडरचे वर्ष बदलवून २०१९-२० वर घेऊन या आणि निरीक्षण करा. तुमच्या शहरात, कदाचित शेजारी असलेले काही गायब झाल्याचे दिसेल. ( 20 years, 10 lakes of Nagpur were swallowed by encroachment)

एका पर्यावरणप्रेमीच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून आम्ही २० वर्षात बदललेली सत्यपरिस्थिती आपणासमाेर मांडताे आहाेत.

१) वाडी परिसरात २००० साली चार तलाव जवळजवळ हाेते. त्यातील एक तलाव एका माेठ्या बिल्डर कंपनीने पूर्ण बुजविले आणि वसाहत वसविली. दुसरा तलाव गाेडाऊनच्या अतिक्रमणात गायब झाला. उरलेले जवळचे दाेन तलाव वस्त्या वसल्याने एका तलावात रुपांतरीत झाले. या तलावांमधून अंबाझरीपर्यंत वाहणारे प्रवाहसुद्धा सुकले, नष्ट झाले.

२) हिंगणा राेड एरियात २००२ साली एअरपाेर्टजवळ एक व एमआयडीसी परिसरात दाेन तलाव तलाव स्पष्ट दिसतात. २०१९ च्या नकाशातून ते गायब झाले. विमानतळाजवळ मेट्राे यार्ड आहे तर एमआयडीसीचे तलाव निवासी वसाहतीत रुपांतर झाले.

३) २००० मध्ये अतिक्रमण नसल्याने विस्तारित असलेला साेनेगाव तलाव २०१९ मध्ये संकुचित झाला. मनीषनगर, बेसा भागात वेडावाकडा असलेला नदीचा प्रवाह अतिक्रमणाने सरळ करून टाकला.

४) रहाटे काॅलनी ते कारागृह भागात २००२ मध्ये दिसणारे लहान तलाव २०२० मध्ये नामशेष झाले.

५) पूर्व नागपूर, पारडी परिसरातून झिकझॅक असलेला नाग नदीचा प्रवाह अतिक्रमणामुळे सुतासारखा सरळ झाला.

६) काेराडी भागात २००३ मध्ये दिसणारे ३ तलाव वीज निर्मिती केंद्राच्या राखेने डबक्यात रुपांतरीत झाले.

७) इतवारीच्या परिसरातही २००० सालच्या नकाशात ३ तलाव तुम्हाला दिसतील. आता यातले दाेन तलाव तुम्ही दाखवून द्या.

८) शुक्रवारी तलावाजवळ २००० साली एक तलाव हाेता. आता त्यावर वसाहत वसली. फ्रेन्ड्स काॅलनी एरिया व नागपूरच्या बाह्यभागातूनही काही वाॅटर बाॅडिज नामशेष झाल्यात.

काेणत्याही गाेष्टीकडे दुर्लक्ष करण्याच्या सामान्यांच्या प्रवृत्तीमुळे नैसर्गिक संपत्तीची सर्रास लूट चालली आहे. या संपत्तीला पैसा कमाविण्याचे माध्यम मानणाऱ्या प्रवृत्तींच्या संगनमताने वारसा संपविला गेला. या साऱ्याचे भयंकर परिणाम भविष्याच्या पिढीला भाेगावे लागतील. निसर्ग, पर्यावरण या साऱ्याचा वचपा काढेल.

- प्राची माहुरकर, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण