शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रोपॅथीतील हस्तक्षेप न्यायालयाने दावा फेटाळला

By admin | Updated: July 10, 2014 00:54 IST

इलेक्ट्रोपॅथी आणि इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या शिक्षणातील राज्य सरकार आणि अन्य प्रतिवादींच्या हस्तक्षेपावर निर्बंध म्हणून स्थायी स्वरूपाचा मनाईहुकूम जारी करण्यात यावा, यासाठी दाखल

दिवाणी न्यायालय : स्थायी मनाईहुकूमाची मागणी नाकारलीनागपूर : इलेक्ट्रोपॅथी आणि इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या शिक्षणातील राज्य सरकार आणि अन्य प्रतिवादींच्या हस्तक्षेपावर निर्बंध म्हणून स्थायी स्वरूपाचा मनाईहुकूम जारी करण्यात यावा, यासाठी दाखल करण्यात आलेला दिवाणी दावा सहावे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर ए.डी. पळसपगार यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. हा दावा ज्ञानेश वाकुडकर अध्यक्ष असलेल्या एज्युकेशनल अ‍ॅण्ड मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (मध्यवर्ती मंडळ) आणि इतर ११ संलग्न शिक्षण संस्थांनी ४ मे २००१ रोजी केला होता. तब्बल १२ वर्षांनंतर हा दावा निकाली काढण्यात आला. ६६३/१९८८ या क्रमांकाच्या एका याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला इलेक्ट्रोपॅथी आणि इलेक्ट्रोहोमिओपॅथी पदवी आणि पदविका अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था बंद करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने १९ आॅगस्ट २००० रोजी परिपत्रक जारी करून या संस्थांवर बंदी घातली होती आणि गृहविभाग व राज्याच्या पोलीस महासंचालकांना या संस्थांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. शासनाचे परिपत्रक परिणामशून्य आणि प्रभावहीन म्हणून जाहीर करण्यात यावे, अन्य प्रतिवादी गृहविभाग आणि पोलीस महासंचालकांना आमच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करण्यावर निर्बंध घालण्यासाठी स्थायी स्वरूपाचा मनाईआदेश जारी करण्यात यावा, अशी विनंती करणारा दिवाणी दावा एज्युकेशनल अ‍ॅण्ड मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया आणि संलग्न संस्थांनी केला होता. आपला अभ्यासक्रम आणि या अंतर्गतची वैद्यकीय सेवा औषधशास्त्राला पर्याय म्हणून आहे. आमची पदवी बोगस नाही, वनस्पतीच्या रसापासून ‘डिस्टिल्ड वॉटर’मध्ये विशिष्ट उष्णतामानात निर्मित केलेल्या औषधांचा वापर इलेक्ट्रोहोमिओपॅथीमध्ये केल्या जातो. या औषधांमध्ये अल्कोहल, विष किंवा कोणतेही रासायनिक पदार्थ नसते. ही औषधे विषारी आणि धोकादायक नाहीत, असा दावाही या संस्थांकडून करण्यात आला होता. डॉ. एन. एल. सिन्हा यांनी पहिल्यांदा भारतात इलेक्ट्रोहोमिओपॅथी शास्त्र आणले. ते नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ इलेक्ट्रो-कॉम्प्लेक्स होमिओपॅथी या संस्थेचे संस्थापक होते. १९२० मध्ये कानपूर येथे हे विद्यापीठ सुरू करण्यात आले होते. देशात अनेक सोसायट्या इलेक्ट्रोहोमिओपॅथी संस्था चालवितात. लखनौ येथील इलेक्ट्रोहोमिओपॅथी मंडळ सोसायटी रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टअंतर्गत तयार झालेले आहे. याच अंतर्गत नवी दिल्ली येथेही इंडियन इलेक्ट्रोहोमिओपॅथिक मेडिकल कौन्सिल आहे. याच आधारावर आपली संस्था आहे. प्रतिवादी हे औषधशास्त्राच्या अ‍ॅलोपॅथी पद्धतीचा केवळ अभ्यास करणारे आणि प्रशिक्षित आहेत. त्यांना इलेक्ट्रोहोमिओपॅथी प्रकियेचे कोणतेही ज्ञान नाही, असेही या दाव्यात नमूद करण्यात आले होते. शासनाने परिपत्रक जारी करताना अन्य प्रतिवादींनी आमच्यावर निर्बंध घालण्यापूर्वी आमचे म्हणणे ऐकण्याची संधी दिली नाही. नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन केले नाही, असेही दावाकर्त्यांनी आपल्या दाव्यात नमूद केले होते.प्रतिवादींनी आपल्या जबाबात असे म्हटले होते की, वादींचा दावा कायद्याच्या दृष्टीने स्वीकारण्याजोगा नाही. तो फेटाळण्यात यावा. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेला अभ्यासक्रम हा पूर्णत: बेकायदेशीर आहे. इलेक्ट्रोपॅथीला देशात मान्यता नाही. आपला बेकायदेशीर धंदा चालवून समाजातील गरीब विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा उकळणे एवढाच वादींचा हेतू आहे, असा आरोपही प्रतिवादींनी उत्तरात केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून वादींना कोणताही दिलासा न देता त्यांचा दावा फेटाळून लावला. न्यायालयात वादींच्या वतीने अ‍ॅड. जे. वाय. घुरडे तर प्रतिवादींच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)