बहीण-जावयाकडून लहान भावाला अमानुष मारहाण; गरम झाऱ्याने दिले जांघेवर चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:31 AM2023-09-05T11:31:30+5:302023-09-05T11:32:30+5:30

रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी दिल्या वेदना : सदर ठाण्यांतर्गतची घटना

Inhuman beating of younger brother by sister and her husband | बहीण-जावयाकडून लहान भावाला अमानुष मारहाण; गरम झाऱ्याने दिले जांघेवर चटके

बहीण-जावयाकडून लहान भावाला अमानुष मारहाण; गरम झाऱ्याने दिले जांघेवर चटके

googlenewsNext

नागपूर : रक्षाबंधन आटोपून अवघे काही दिवस झाले असताना भाऊबहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना नागपुरात घडली आहे. भाऊ काम करत नाही या मुद्द्यावरून मोठी बहीण व तिच्या नवऱ्याने एका तरुणाला अमानुष मारहाण केली आणि चक्क गरम झाऱ्याने त्याच्या शरीरावर चटके दिले. सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

करण रामदास खंडाते (२०, गोंडपुरा) असे तक्रार करणाऱ्या भावाचे नाव आहे. तो एका टपरीवर काम करतो. त्याच्या वडिलांच्या घरीच त्याची बहीण निशा खंडाते-अहीराव व धीरज अशोक अहीराव (२७) देखील राहतात. लहानसहान कारणावरून ते अनेक दिवसांपासून करणशी वाद घालायचे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी २९ ऑगस्ट रोजी करण रात्री साडेअकरा वाजता कामावरून घरी आला. त्याच्या बहिणीने त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. त्याने जेवणाचे ताट घेतले असता जावई धीरजने त्याला शिवीगाळ सुरू केली. बाहेर जाऊन काम करता येते, मात्र घरच्या कामाला हात लावत नाही. फक्त फुकटचं खायला पाहिजे या शब्दात त्याने वाद घातला. त्यानंतर धीरजने करणला मारहाण करायला सुरुवात केली.

तो वेदनेने ओरडत असताना निशा तेथे आली व आज याला चांगली अद्दलच घडवते, असे म्हणून गरम झाऱ्याने त्याच्या गालावर व जांघेवर चटके दिले. जर ही गोष्ट कुणाला सांगितले तर जीवे मारण्याचीदेखील दोघांनी धमकी दिली. त्यांच्या भीतीमुळे करण घरीच बसला व त्याने कुणालाही हा प्रकार सांगितला नाही. मात्र अखेर त्याने हिंमत करून सोमवारी सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याची मोठी बहीण व जावयाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Inhuman beating of younger brother by sister and her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.